फोटो सौजन्य: iStock
एखाद्या सध्या पदार्थाला चविष्ट बनवण्यात भज्जीचा वाटा खूप मोठा असतो. सर्वसामान्यांसाठी भज्जी नेहमीच एक स्पेशल पदार्थ राहिला आहे. आजही भज्जी बनत असेल तर घरातील सदस्यांना ती कधी खाण्यास मिळणार असे वाटत असते. तसेच घरी आपण बऱ्याचदा पुऱ्या किंवा पकोडे तळल्यानंतर कढईतील उरलेले तेल वापरतो. पण हे करणे खूप हानिकारक आहे.
कुकिंग झाल्यानंतर उरलेले तेल वारंवार वापरणे योग्य नाही असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. असे केल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. बरेचदा लोक उरलेले तेल फेकून देण्याऐवजी ते वापरणे पसंत करतात. पण तुमचा हा छोटासा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो.
Vitamin Deficiency: या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडातून येतो घाण वास, वेळीच लक्ष द्या
अभ्यासानुसार, कुकिंग झाल्यानंतरचे तेल पुन्हा गरम केल्याने यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात फ्री रॅडिकल्स देखील वाढतात, ज्यामुळे जळजळ आणि विविध जुनाट आजार होतात. फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड्स ऑर्ट ऑफ इंडिया (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल पुन्हा गरम करणे टाळले पाहिजे. पण जर तुम्हाला तेल पुन्हा वापरायचे असेलच तर ट्रान्स-फॅट तयार होऊ नये म्हणून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त तीन वेळा वापर करू शकता.
उच्च तापमानावर गरम केलेले तेल टॉक्सिक धूर सोडते. प्रत्येक वेळी तेल गरम केल्यावर ते स्मॉक पॉइंटपर्यंत पोहोचते आणि अधिक जलद दुर्गंध सोडते. जेव्हा असे होते, तेव्हा अनहेल्दी पदार्थ हवा आणि तयार होणाऱ्या अन्नात रिलीज होते.
उच्च तापमानात, तेलात असलेले काही चरबी ट्रान्स फॅट्समध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स हे हानिकारक फॅट्स आहेत जे हृदयरोगाचा धोका वाढवतात. जेव्हा तेलाचा पुन्हा वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅटचे प्रमाण आणखी वाढते.
Gardening Tips: थंडीत बागेतील झाडे हिरवीगार ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स एकदा फॉलो कराच
उरलेल्या तेलाचा वापर करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते, विशेषत: ब्लड प्रेशरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. प्रत्येक वेळी तेल गरम केल्यावर त्यात बदल होतात, आणि ते आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ निर्माण करू शकते. उरलेले तेल अधिक वेळा वापरल्याने त्यात ट्रांस फॅटी ऍसिड्स आणि अन्य हानिकारक रासायनिक पदार्थ तयार होतात. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचे धोके देखील वाढतात.
जर तुम्ही तेलाचा पुनर्वापर करण्याचा विचार करत असाल तर ते त्यात कोणत्या प्रकारचे अन्न तळले जात आहे, ते कोणत्या प्रकारचे तेल आहे, ते कोणत्या तापमानाला गरम केले गेले आणि त्यात किती वेळ अन्न तळले गेले याचा विचार करा.