फोटो सौजन्य: Freepik
हल्ली स्वीगी आणि झोमॅटो मुळे अनेक जण ऑनलाइन फूड ऑर्डर करत आहे. यामुळे हॉटेलवाल्यांचा धंधा एकदम जोरात सुरु आहे. पण अनेक वेळा आपण बघतो की हॉटेलवाले पार्सल जेवण एक काळ्या डब्ब्यात पॅक करून देत असतात. हे काळे बॉक्स म्हणजेच कंटेनर अतिशय सोयीस्कर आहेत, ज्यामध्ये अन्न सहजपणे पॅक केले जाऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का की हे स्वस्त आणि सोयीचे कंटेनर तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात.
शास्त्रज्ञांना या कंटेनरमध्ये ‘डेकाब्रोमोडिफेनिल इथर’ नावाचे धोकादायक रसायन सापडले आहे. आग पसरू नये म्हणून या रसायनाचा वापर केला जातो. म्हणून याला ‘फ्लेम रिटाडेंट्स’ असेही संबोधिले जाते. आगीचा प्रसार रोखण्याच्या क्षमतेमुळे त्यात गरम अन्न सहजपणे पॅक करून पाठवता येते.
हे देखील वाचा: चिकन कि पनीर? आरोग्यास जास्त पोषक ठरतो ‘हा’ खाद्यपदार्थ, जाणून घ्या
कंटेनर मध्ये असणाऱ्या गरम अन्नामुळे ही रसायने वितळतात आणि अन्नामध्ये मिसळतात, जे नंतर आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. या प्लास्टिकच्या गंभीर आरोग्य समस्यांमुळे अमेरिकेने 2021 मध्ये त्यावर बंदी घातली होती. मात्र भारतात या प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे. परिणामी अनेक आजारांचा धोका वाढला आहे.
लहान मुलांवर होतो परिणाम: या काळ्या प्लॅस्टिकमध्ये असलेले ‘डेकाब्रोमोडिफेनिल इथर’ लहान मुलांच्या विकासात अडथळा आणू शकते. त्यामुळे मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेलाही हानी पोहोचते.
आरोग्यावर परिणाम: हार्मोन्स नियंत्रित करणाऱ्या ग्लैंड- एंडोक्राइनवर या रसायनाचा नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे थायरॉईड रोगाचा धोका वाढतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा परिणाम होतो.
कर्करोगाचा धोका: एप्रिल 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांच्या रक्तात फ्लेम रिटाडेंटचे प्रमाण जास्त होते त्यांना कर्करोगा होण्याचा धोका 300 टक्के जास्त असतो. काळ्या प्लास्टिकमध्ये आढळणाऱ्या ‘पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन’ नावाच्या रसायनामुळेही कर्करोगाचा धोका निर्माण होतो. या रसायनामुळे श्वसनाचा त्रासही उद्भवू शकतो.
काळ्या प्लास्टिकचे कंटेनर वापरू नका – रेस्टॉरंटमधील काळ्या कंटेनरचा पुन्हा वापर करू नका. अन्न मायक्रोवेव्ह करण्यासाठी नेहमी काचेची भांडी वापरा. अन्न दुसर्यांना देताना स्टील किंवा काचेच्या भांड्याचा वापर करा.
घरात स्वच्छता ठेवा: घरातील धूळ नियमितपणे स्वच्छ करा आणि हात धुवा.
वेंटिलेशनची काळजी घ्या: घरात हवेचा संचार कायम ठेवा.