दुधाचा चहा आरोग्यासाठी घातक
जगभरात सगळीकडे चहाप्रेमी आहेत. काहींना सकाळी उठल्यानंतर लगेच बेड टी लागतो, तर काहींना दिवसांतून ३ ते ४ वेळा चहा पिण्याची सवय असते. चहा हे पेय जगभरात सगळीकडे मिळते. चहा प्याल्यानंतर फ्रेश वाटते. अनेक लोक ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी आणि दुधाचा चहा इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा चहा पितात. यातील सगळ्यांचा आवडता चहा म्हणजे दुधाचा चहा. दुधाचा चहा प्यायला जरी चांगली लागला तरीसुद्धा आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. काही लोक दुधाची चहा जास्त वेळ उकळून पितात.
जास्त वेळ चहा उकळल्याने आरोग्यावर त्याचे धोकादायक परिणाम होतात. यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जास्त वेळ चहा उकळवून प्याल्यास आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला दुधाचा चहा जास्त वेळ उकल्यामुळे नेमके काय गंभीर परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock )
काहींना गॅसवर चहा बनवायला ठेवल्यानंतर जास्त वेळ उकळत ठेवण्याची सवय असते. पण चहा ४ ते ५ मिनिटांच्या पुढे उकळवु नये. तसेच दुधाचा चहा बनवल्यानंतर तो त्वरित प्यावा. १० मिनिटं झाल्यानंतर दुधाचा चहा पिऊ नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.