अमोल नायकवडी
धुम्रपान ही सध्याच्या जगातील एक गंभीर समस्या बनली आहे. तरूणांपासून ते वृद्धांपर्यत अनेकजन या विळख्यात अडकलेले आपल्या आजूबाजूला दिसतात. अनेकांची यातून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा असते. मा६ ते शक्य होत नाही. तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा कशामुळे होते? राग आल्याने? कंटाळवाणे वाटत असल्यामुळे? थकवा आल्याने? की आनंदामुळे? तुम्हाला धूम्रपानाशी संबंधित या सर्व भावना दिसून येऊ शकतात, पण धूम्रपानासाठी तणाव व राग या गोष्टी वेगळ्या कारणीभूत ठरू शकतात.
तुम्ही चिंताग्रस्त असताना धूम्रपान करण्याची गरज वाढू शकते. तुम्हाला वाटू शकते की मन:शांतीसाठी धूम्रपान करण्याची गरज आहे. पण धूम्रपानामुळे तणाव कमी होण्याऐवजी वाढत जातो.
तसेच, आजच्या काळात आरोग्यसेवेतील तंत्रज्ञान हस्तक्षेपामुळे लोक आता त्यांचे निकोटीन अवलंबित्व आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांची पूर्वस्थिती जाणून घेण्यासाठी अनुवांशिक चाचणी करू शकतात. यामुळे त्यांना धूम्रपान सोडण्यास आणि असल्यास धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्यास मदत होईल.
असे निदर्शनास आले आहे की, कोव्हिड-१९ महामारीमुळे लाखो धूम्रपान करणा-या व्यक्तींनी धूम्रपान सोडले आहे. यामागील कारण म्हणजे कोविडचा धोका धूम्रपान करणा-या व्यक्तींना सर्वाधिक आहे. धूम्रपान हे श्वसनविषयक आजारांसह फ्लूसाठी धोकादायक आहे. धूम्रपानामुळे व्हायरल संसर्गाविरोधात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. जगभरातील जवळपास ६० टक्के धूम्रपान करणा-या व्यक्तींची धूम्रपान सोडण्याची इच्छा आहे, पण जगातील फक्त ३० टक्के व्यक्तींना तंबाखूचे सेवन सोडण्यासंदर्भात दर्जेदार सेवा उपलब्ध आहेत.
इंडस हेल्थ प्लसच्या मते ७ टक्के व्यक्ती धूम्रपान करणे सुरू ठेवतात आणि जवळपास ३ टक्के व्यक्तींनी गतकाळात धूम्रपान केले आहे, पण आता धूम्रपान करत नाहीत. तंबाखू सेवनासंदर्भात संशोधनामधून निदर्शनास आले की, ८ टक्के व्यक्तींना तंबाखू सेवन करण्याची सवय होती आणि २ टक्के व्यक्ती आता तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करत नाहीत.
धूम्रपानाशिवाय तणावाचा सामना कसे करावे हे आत्मसात करणे अवघड आहे, विशेषत: तुम्ही पहिल्यांदाच धूम्रपान सोडत असाल तर अधिक अवघड होऊन जाते. पण काही साधने व काहीशा नियंत्रणासह तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टीपेक्षा ही बाब साध्य करणे कमी अवघड असल्याचे दिसून येईल.
निकोटिन व्यसनामधून बरे होताना
निकोटिन व्यसनाच्या उपचाराचे दोन प्रमुख घटक आहेत. प्रत्यक्ष निकोटिनचे सेवन थांबवणे आणि धूम्रपानाशी संबंधित औपचारिक भावना कमी करणे;
निकोटिन व्यसन दूर करण्यासंदर्भातील व्यवस्थापन: तुमचे शरीर निकोटिन व्यसन थांबवण्याप्रती आणि तुम्ही ओढणाऱ्या सिगारेटमधील हजारो रसायनांप्रती प्रत्यक्ष प्रतिक्रिया देते. या रिकव्हरी टप्प्यादरम्यान तणाव निर्माण होतो, जो हाताळण्यास तुम्ही सज्ज असले पाहिजे. निकोटीन व्यसनातून लवकर बरे होण्याचे उप-उत्पादन म्हणून तणावाच्या कारणांबाबत जागरूकता आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी काही साधने तुम्हाला यशस्वीरित्या व्यवस्थापन करण्यास मदत करतील.
मानसिक आव्हानांचा सामना करताना: भावनिकदृष्ट्या धूम्रपान सोडताना तुम्हाला सिगारेट्स सोडण्याच्या स्थितीचा सामना करण्यासोबत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागते. मानसिक आव्हाने धूम्रपान सोडण्यामधील सर्वात खडतर पैलू असू शकतात.
निकोटिन सोडताना येणा-या तणावाचे व्यवस्थापन
स्वत: संयम राखा आणि निष्पत्ती दिसून येण्यासाठी रिकव्हरी प्रक्रियेला वेळ द्या. काळासह निकोटिन व्ससन कमी होत जाते. तुम्ही एकामागोमाग एक जुने सहवास व सवयी सोडून नवीन आरोग्यदायी सवयी अवलंबता तेव्हा हा बदल दिसून येईल. तुमच्या निदर्शनास येईल की, धूम्रपान करण्याऐवजी धूम्रपान सोडून तणावाचे उत्तमरित्या व्यवस्थापन करता येऊ शकते.
धूम्रपान सोडणे कमी आव्हानात्मक करतील अशा काही पद्धती पुढीलप्रमाणे:
योग्य संतुलित आहाराचे सेवन करा: शरीराला उत्तम दर्जाच्या ऊर्जेची गरज असते, जी शरीरातील विषारी पदार्थ दूर करते. धूम्रपानामुळे अनेक पौष्टिक घटक व जीवनसत्वे कमी होते, म्हणून उत्तम संतुलित आहाराचे सेवन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या: पाणी तुम्हाला धूम्रपान सोडण्यामध्ये मदत करू शकते. पाण्यामुळे त्वरित डिटॉक्स होण्यास मदत होते आणि ते व्हॅक्युम बस्टर म्हणून देखील काम करू शकते. हायड्रेटेड राहणे शरीरासाठी उत्तम आहे.
कॅफिनचे प्रमाण कमी करा: तुम्ही धूम्रपान सोडता तेव्हा सेवन करणारे कॅफिनेटेड कॉफी किंवा सोडा तुमची चिंता व तणावामध्ये अधिक भर करू शकतात. तुम्ही पूर्णपणे धूम्रपान सोडून दिल्यानंतर पुन्हा कॉफी पिऊ शकता, पण कदाचित ते प्रमाण पूर्वीप्रमाणे नसू शकते.
कोमट पाण्याने आंघोळ करा: शांत होण्यासाठी व आरामासाठी आंघोळ करणे हा उत्तम मार्ग आहे. काही मेणबत्त्या लावा, सुगंधित आंघोळीचा साबण वापरा आणि बाथटबमध्ये आंघोळ करण्याचा आनंद घ्या. एका संशोधनामधून निदर्शनास आले की, नियमितपणे आंघोळ करणा-यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते. गरम पाण्यामध्ये आंघोळ केल्याने निकोटिन व्यसनाची दोन सामान्य लक्षणे थकवा व चिडचिडपणा कमी होऊ शकतो.
मसाज घ्या: आपल्या शरीराची स्नायूंमध्ये असलेले तणाव ठेवण्याची वृत्ती असते, म्हणून तणाव दूर करण्यासाठी उत्तम मसाज घेणे उत्तम ठरू शकते. तुमच्या जोडीदाराला स्नायूंमधील तणाव दूर करण्यामध्ये मदत करण्यासाठी मसाज करायला सांगा. संपूर्ण बॉडी मसाज उत्तम आहे, पण १० ते १५ मिनिटांसाठी मान, खांदा, चेहरा व टाळूवर केलेला मसाज देखील उत्तम ठरू शकतो. तुम्ही मसाज पिस्तोल किंवा मसाज कूशन अशा ऑटो मसाज साधनांचा देखील वापर करू शकता.
पुरेशी झोप घ्या: धूम्रपान सोडण्याचे पहिले काही दिवस शरीर व मनावर तणाव असल्यामुळे थकवा आणणारे ठरू शकतात. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, धूम्रपान कमी केल्यास तुम्हाला कमी थकल्यासारखे वाटेल. एका संशोधनाने निदर्शनास आणले की धूम्रपान सोडणा-या व्यक्तींमध्ये थकवा सहा आठवड्यांनंतर वाढला आणि त्यानंतर कमी झाला.
आपले मन लहान समस्यांना मोठे करू शकते आणि विशेषत: आपल्या भावनांवर नियंत्रण नसेल तर प्रत्येक लहान गोष्टीला जटिल समस्यांमध्ये बदलू शकते. तुमचा दिवस वाईट गेला असेल तर थांबा आणि पुन्हा विचार करा. स्वत:शी चांगलेपणाने वागा, चांगल्या कृतींमध्ये सामील व्हा (किंवा दोन्ही) आणि चांगले होत असल्याच्या भावनांमध्ये वाहून जाऊ नका. उद्या नवीन दिवस आहे, तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा धूम्रपान करत नसल्याचा आनंद होईल.
(लेखक इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तज्ञ म्हणून कार्यरत आहेत)