हृदयस्पर्शी विचारांनी करा दिवसाची आनंद आणि उत्साहाने सुरुवात, सकारात्मक ऊर्जेमुळे राहाल कायमच फ्रेश
सुप्रभात किंवा शुभ सकाळ हे केवळ शब्द नसून सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी म्हंटले जाणारे प्रेरणादायी विचार आहेत. दिवसाची सुरुवात आनंदाने होण्यासाठी अनेक लोक व्यायाम करतात तर काहींना सुंदर जुनी गाणी ऐकायला खूप जास्त आवडते. सकाळचा वेळ म्हणजे नव्या ऊर्जेचा, नव्या विचारांचा आणि नव्या संधींचा आरंभ असतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कायमच फ्रेश राहावे. दिवस खूप चांगला आणि आनंददायी वातावरणासह उत्साहात जावा यासाठी तुम्ही नातेवाईकांना या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाली तर संपूर्ण दिवस खूप आनंद जातो.(फोटो सौजन्य – istock)
आयुष्य हा एक सुंदर प्रवास….! दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने …
“फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, आयुष्यात असेच सुख मिळो, हीच देवाकडे प्रार्थना, शुभ सकाळ!”
“आजचा दिवस तुमचा आहे, तो आनंदाने आणि उत्साहाने जगा, कालची चूक विसरून आज नवीन सुरुवात करा”.
“आयुष्य हे एक कला आहे, आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनवास. तुमच्या रंगांनी तो सुंदर बनवा”
“काहीतरी चांगले मिळवण्यावर प्रत्येकजण हसतो, पण खरा आयुष्य तो जगतो जो खूप काही गमावूनही हसतो”.
“विश्वास ठेवा, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस ठरू शकतो”.
सकाळच्या या प्रसंगी माझी
अशी इच्छा आहे की,
आपली नाती वाऱ्यासारखी असावीत,
जरी ती दिसत नसली
तरी त्यात मायेची उब कायम असावी.
ती शब्दांत सांगता येणार नाही
इतकी आपुलकी आणि
जिव्हाळ्याने भरलेली असावी.
शुभ प्रभात
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभसकाळ
कोवळे किरण देतात प्रेमळ हाक,
मंद वारे करतात हळुवार स्पर्श.
तुमच्या जीवनात दररोज येवो,
आनंददायी आणि सुखद सकाळ.
!! शुभ प्रभात !!
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे नाव आणि इज्जत…
शुभसकाळ
माणसाचा स्वभाव मुक्त वाय-फायसारखा असावा,
ज्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नसावी;
लोक सहजच जोडले जावेत.
कारण, प्रभावी व्यक्तिमत्त्वापेक्षा उत्तम स्वभाव अधिक महत्त्वाचा आहे.
शुभ प्रभात
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभसकाळ
सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने …
राव तुम्हाला परिपूर्ण बनवतो
दुःख तुम्हाला माणूसकी शिकवते
अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते
यश तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देते
परंतु इच्छाशक्तीच तुम्हाला ध्येय्य
साध्य करण्याची प्रेरणा देते.
Good Morning
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभसकाळ






