फोटो सौजन्य- pinterest
जया एकादशी हा भारतातील एक विशेष सण आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, जया एकादशीच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान केल्याने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. जया एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या
जया एकादशीची तिथीची सुरुवात बुधवार, 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 4 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, 29 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार जया एकादशीचे व्रत गुरुवार, 29 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे.
गरीब आणि गरजूंना कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः पिवळे किंवा पांढऱ्या रंगांच्या कपड्यांचे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.
तूप आणि तीळ दान केल्याने आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळतो. धार्मिक श्रद्धा अशी आहे की तीळ दान केल्याने पापे दूर होण्यास मदत होते.
एकादशी व्रताच्या दिवशी फळे आणि मिठाईचे दान करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना, ब्राह्मणांना किंवा मंदिरांना पैसे दान करणे फायदेशीर आहे. यामुळे आर्थिक समस्या कमी होतात. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
जया एकादशीच्या दिवशी दिवा, तेल किंवा तूप दान केल्याने घरात शांती आणि आनंद टिकून राहते. तसेच नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो.
जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जया एकादशीचे व्रत केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. याशिवाय, असे मानले जाते की हे व्रत वाईट शक्ती आणि नकारात्मकतेपासून संरक्षण करते. जया एकादशीचे व्रत मोक्षाचा मार्ग मोकळा करते आणि जीवनात शांती, सकारात्मक विचार आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यावेळी 29 जानेवारी रोजी आहे
Ans: शास्त्रानुसार जया एकादशीला केलेले दान अनेक पटींनी पुण्यफळ देणारे मानले जाते. या दिवशी दान केल्याने पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा मिळते.
Ans: अन्नधान्य, फळे आणि दूध, वस्त्र, तूप किंवा तेल, धनदान या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते






