फोटो सौजन्य - Social Media
कधी कधी आपल्या वाढत्या कामामुळे आपल्या आयुष्याचा कंटाळा येत असतो. हळू हळू हा कंटाळवाणेपणा आपल्याला त्रास देत सुटतो. जरी आपल्या आवडीचे काम असले तरी त्या कामामध्ये आपल्याला आवड राहत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या मेंदूमध्ये प्रभाव टाकत असतात, ज्याचा मानसिक त्रास आपल्याला जाणवत असतो. कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. प्रत्येक वेळी मानसिक तणाव असतो, जर तुम्हाला या गोष्टी जाणवत आहेत तर वेळीच सावध व्हा! कारण तुम्हाला बर्नआउट सिंड्रोम हा विकार आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या क्रोनिक वर्कप्लेस स्ट्रेसमुळे या गोष्टी घडतात. कामाचा तणाव बर्नआउट सिंड्रोमला कारणीभूत ठरतो.
हे देखील वाचा : डोळ्यांवरील चष्मा कायमचा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या ‘या’ फळाचे नियमित करा सेवन, चष्मा होईल कायमचा दूर
जर तुम्हाला या समस्येचा त्रास आहे कि नाही हे जाणून घेणे सोपे आहे. बर्नआउट सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना कामात मन लागत नाही. कामामध्ये कार्यक्षमता ढासळते. कामामध्ये काहीच एनर्जी उरत नाही. काम जरी आवडते असले तरी ते कंटाळवाणे बनत जाते. नोकरीबद्दल मनामध्ये वाईट वाईट विचार येत जातात. विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी एक काम पूर्ण करण्यासाठी एक ठराविक काळ दिला जातो.नोकरवर्गांना ते काम दिलेल्या वेळच्या आतमध्ये करायचे असते. जर आपल्याला ते काम दिलेल्या वेळेच्या आतमध्ये पूर्ण करणे कठीण जात आहे तर समजून जा कि तुम्हाला बर्नआउट सिंड्रोम असण्याची अफाट शक्यता आहे.
ऑफिसवर असलेले प्रेशर किंवा एका साथीदाराबरोबर झालेले भांडण किंवा काम करण्यात येणारे अडथळे आणि होणारे त्रास अशा अनेक गोष्टी बर्नआउट सिंड्रोमच्या निर्मितीला कारणीभूत असतात. अशा वेळी व्यक्ती फार विचारात असतो. मानसिक तणाव वेटाकुटिला आणि शिग्रतेला असतो. हेच शरीरामध्ये बर्नआउट सिंड्रोमला कारणीभूत ठरते. याचा शरीरावर फार दुष्परिणाम होतो आणि आरोग्य विस्कळीत होते. न्यूरोसाइंस सांगतात कि, नेहमी कामामध्ये असल्याने याचा आपापला मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. लॉकस कोर्यूलियस नावाचा मेंदूच्या भागाची काम करण्याची गती मंदावते. मेंदूचा हा भाग काम करण्याच्या गतीवर नियंत्रण ठेवतो. त्या भागाची कार्यक्षमता मंदावल्याने आपल्या संपूर्ण शरीराची कार्यक्षमता मंदावते.
हे देखील वाचा : हे पाच प्रकारचे व्यायाम देतात वेट लॉसची हमी; वजन होईल अल्पावधीत कमी
बर्नआउट सिंड्रोम अनेक प्रकारे आपल्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकतो. क्रिएटिव्हिटी कमी होत जाते, कार्यक्षमता बिघडते, डोक्यात फक्त नि फक्त तणाव असतो, खोल विचार करण्याची क्षमता ढासळते. जर तुम्हाला या पासून स्वतःला वाचवायचे आहे तर कामात जास्त स्वतःला गुंतवू नका. ऑफिसचे काम ऑफिसमध्येच ठेवा त्याला घरपोच आणू नका. या परिस्थितीमध्ये झोपेची आवश्यकता असते, तर पुरेशी झोप घेत चला. जेव्हा परिस्थिती जास्त वाढत चालली असेल तर डॉक्टरचा सल्ला घ्या.