टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव (Photo Credit- X)
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🇮🇳#TeamIndia clinch a record 3️⃣rd ICC Men’s #T20WorldCup title 🏆 Take. A. Bow 🫡#MenInBlue | #Final | #INDvNZ pic.twitter.com/nml1AZY5tK — BCCI (@BCCI) March 8, 2026
भारताने घरच्या मैदानावर टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. म्हणजे टी-२० विश्वचषक जिंकलाच नाही तर त्यासोबतच भारतीय संघाने इतिहास रचला आहे.
त्याआधी, नाणेफेक गमावून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रिक केल. टीम इंडियाने कोणतीही दया मया न दाखवता किवी संघाला धुवायला सुरुवात केली. भारतीय ओपनरने जी तोडफोड केली ते थांबलेच नाही. पूर्ण विश्वचकात फार्म न मिळालेला अभिषेक शर्मा फायनला तापला आणि त्याने २१ चेंडून ५२ धावांची घातक खेळी केली. तसेच आपल्या जबरदस्त फार्म असलेल्या संजूने आज पुन्हा चमत्कार केला. त्याने ४६ चेंडून ५ चौकार आणि ८ षटकारासह ८९ धावांची खेळी केली. भारतीय संघात पुनरागमन करणार इशान किशन या सीजनमध्ये चांगलात गाजला त्याने २५ चेंडूत ५४ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने परफेक्ट फिनिशरची भूमिका निभावली त्याने ८ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारसह २६ धावा करत कहर केला आणि किवीसंघासमोर २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडकडून नशीम जेम्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर रचिन रवींद्र आणि मॅट हॅनरी एक विकेट मिळाली.
IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यालाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात वाईट झाली. सलामीवीर फिन ऍलन ९ धावा करताच माघारी परतला. टिम सेफर्टने ५२ धावा करत संघाल थोडे योगदान दिले. त्यानंतर अक्षर पटलने फिरकी मारा करत धडाधड विकेट पाडायला सुरुवात केली. न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरने संघाला सावरायला सुरुवात केले पण तोही ४३ धावा करुन बाद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने घातक मारा करत किवीचे कंबरडे मोडले अन् ४ ओव्हर्स टाकून ४ विकेट घेत फक्त १५ धावा दिल्या. न्यूझीलंडचा संघ १९ षटकात फक्त १५९ धावा करु शकला.
टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.






