मायग्रेन ही समस्या व्यक्तीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे निर्माण होते. थोडक्यात आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर (Body) होतो. मायग्रेन डोकेदुखीचा एक प्रकार आहे . यामुळे उलट्या होणे, घाबरणे आणि डोक्यात मुंग्या येणे, अशी लक्षणे दिसतात. कधीकधी हे दुखणे सहन करण्याची क्षमता संपते.
पूर्वी हा त्रास ३५ ते ४० वर्षे वयोगटातील लोकांमध्ये जास्त होता. मात्र जीवनशैलीत (Lifestyle) बदल झाल्याने आता मायग्रेनची समस्या २० ते २६ वर्षे वयोगटातील तरुणांमध्येही दिसून येते. मायग्रेनच्या दुखण्यामध्ये खाणे-पिणे खूप महत्त्वाचे आहे. मायग्रेन असलेल्या व्यक्तीला आपले आरोग्य (Health) खूप काळजीपूर्वक सांभाळावे लागते. काही पदार्थ खाणे त्यांना सोडावे लागतात.
हे पदार्थ व्यर्ज करा
मटण, हॅम, हॉट डॉग, सॉसेजेस यांसारख्या पदार्थांमध्ये नायट्रेट्स नावाचे पदार्थ असतात जे रंग आणि चव वाढवण्याचे काम करतात. हे सर्व पदार्थ मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये वाहणारे रक्त पातळ करतात, ज्यामुळे मायग्रेनचा (Migraine)त्रास सुरू होतो. चायनिज जास्त खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. यात अजिनोमोटो वापरले जाते. ते थोडे जरी खाल्ले तरी त्याचा त्रास होऊ शकतो. चॉकलेटमध्ये कॅफिन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन हे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात.
त्यामुळे चॉकलेट खाल्लावर डोकेदुखीची समस्या वाढू शकते. जास्त डार्क चॉकलेट खाल्ल्याने अधिक त्रास होऊ शकतो. काही आरोग्य तज्ञांच्या मते, कॅफिनमुळे मायग्रेनचा त्रास कमी करता येतो. पण जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्यास मायग्रेनचा (Migraine) त्रास वाढतो. तुम्ही जर दिवसातून अनेकदा चहा(tea), कॉफी(coffee) पित असाल तर मायग्रेनचा त्रास अधिक वाढू शकतो.