उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे
शरीरासाठी कोलेस्ट्रॉल अतिशय महत्वाचे आहे. कारण शरीरात असलेले चांगले कोलेस्ट्रॉल निरोगी पेशी तयार करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. शिवाय यामध्ये असलेले घटक शरीरातील रक्तभिसरणास चालना देतात. पण शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शरीराच्या नसांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. शिवाय यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांमध्ये पिवळा रंगाचा जमा झालेला चिकट थर आरोग्याचे नुकसान करतो. त्यामुळे तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन करणे टाळावे.(फोटो सौजन्य – iStock)
खराब कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. अपुरी झोप, चुकीचा आहार, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे शरीरात जाणवू लागल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पायांमध्ये वेदना होणे किंवा पायांमध्ये मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. शिवाय रात्रीच्या वेळी शरीरात अनेक गंभीर लक्षणे जाणवू लागतात. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीरातील रक्तभिसरण बिघडते, हातापायांमध्ये मुंग्या येणे, पाय दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे अधिक काळापासून जाणवत असलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो उपचार करावे.
उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर पायांना सूज येऊन त्वचेमध्ये बदल जाणवू लागतात.त्वचेमध्ये बदल होऊन पायांचा रंग बदलू लागतो. शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊन पायांना सूज येऊ लागते. हातापायांच्या त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरात अशक्तपणा जाणवतो? मग दैनंदिन आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन
कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यानंतर डोळ्यांभोवती पिवळे खड्डे दिसू लागतात. डोळ्याभोवती फॅटी, पिवळे अडथळे दिसू लागतात. त्यामुळे डोळ्यांसंबंधित लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.