भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते...; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताबद्दल परदेशींकडून अनेक नकारात्मक चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात. भारत असुरक्षित आहे, तिथले जेवण तिखट असते किंवा भारत खूप अस्वच्छ असते. अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या अनुभवांच्या चर्चा येतात. सध्या एका ऑस्ट्रेलिय ट्रॅव्हलरने तिचा भारतातील प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलर बेक मॅककॉल सांगते की, तिला भारताता खूप आनंद झाला. तिने भारतीयांचे कौतुक केले आहे.
बेकने सोशळ मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘मी खूप गोंधळलेली आहे. ज्या भारतात येण्यापासून मला लोक थांबवत होते, तो हाच भारत आहे का? असा प्रश्न तिने केला आहे. भारतात येण्यापूर्वी तिने अनेक वाईट अफवा ऐकल्या होत्या. तिला अत्यंत भितीदायक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. पण प्रत्यक्षात भारतात तिला प्रेम, आपुलकी आणि लोकांची उदारता पाहायला मिळाली असल्याचे ती म्हणते. बेकने राजस्थानमधील उदयपूर, पुष्कर, गुजरातमधील ग्रामीण भागांना भेट दिली आहे. तिने सांगितले की, अनोळखी लोकांनी तिला प्रेमाने चहा ऑफर केला, रस्ता चुकल्यावर तिला मदत केली धावत्या ट्रेनमध्ये पिज्जा ऑर्डर केला असे बेक म्हणते.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
बेकने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लोकांना सांगितले आहे की, भारतात चांगल्या गोष्टी आहे. लोक काय सांगातात यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रवास करुन बघा. ती म्हणते की, कोणत्याही देशाबद्दल मत इतरांच्या सांगण्यावरुन बनवण्यापेक्षा स्वत:च्या अनुभवातून समजून घ्या.
सध्या बेकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ भारतीयांच्या पसंतीस पडत असून अनेकांनी बेकचे भारतात स्वागत केले आहे. तसेच अतिथी देव भव म्हणजे पाहुणा हा देवासारख असतो भारतीयांना असे म्हटले आहे. या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
शिकार करायला बगळा सज्ज पण तितक्यातच सापाने पलटला वार, मान आवळली अन्… शिकारीचा Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






