घरगुती पेनकिलर तयार करण्याची कृती
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. सर्दी खोकला होणे, सांधेदुखी, अंगदुखी, कंबर दुखणे इत्यादी हाडांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते. अशावेळी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेण्याऐवजी मेडिकलमधून पेनकिलरच्या गोळ्या आणून खातात. या गोळ्यांच्या सेवनामुळे तात्काळ आराम मिळतो. पण नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. शिवाय पेनकिलरच्या गोळ्या खाणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोणत्याही दुखण्यावर मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्या जातात. मात्र याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या आणून खाल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेण्याऐवजी अनेक लोक मेडिकल मधून पेनकिलरच्या गोळ्या आणून खाण्याचा सोपा पर्याय निवडतात. मात्र यामुळे आरोग्याला हानी पोहचते. पेनकिलरच्या गोळ्या तात्पुरता आजार बरा करण्यासाठी मदत करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पेनिकलरच्या गोळ्या खाण्याऐवजी छोट्या मोठ्या दुखण्यांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदातील काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तात्काळ आराम मिळेल.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो. यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. या तेलाच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. कोणत्याही प्रकारच्या वेदना, सूज इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्ही एरंडेल तेलाचा वापर करू शकता.






