लाडक्या शिक्षकांना द्या या खास शुभेच्छा
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप महत्वाचे आहे. आपल्या आयुष्यात आलेली गुरु रुपी शिक्षक आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. माणसाचे आयुष्य घडण्यासाठी गुरु आणि शिक्षक असतात. दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे अनेक शिक्षक असतात ज्यांनी त्यांना मार्गदर्शन करून जीवन घडवण्याची योग्य दिशा दाखवली आहे. संपूर्ण भारतामध्ये 5 तारखेला शिक्षक दिन साजरा केला जातो. तसेच शिक्षक दिन साजरा करण्याचे दुसरे अवचित्त म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे तुम्हासुद्धा तुमच्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा द्याच्या असतील तर या गोड शुभेच्छा तुम्ही तुमच्या शिक्षकांना नक्की पाठवू शकता.(फोटो सौजन्य-istock)
“गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..
लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”
“लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले…
बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले…
अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
हे देखील वाचा: गोव्यातील गणेशोत्सव: परंपरा आणि एकतेचा मेळ संस्कृतीचं प्रतिबिंब
योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,
जेव्हा काहीच कळत नाही,
तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..
आयुष्यातील प्रत्येक अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही..
हॅपी टीचर्स डे..!
आम्हाला प्रेरित करण्यासाठी,
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,
आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,
तुमचे खूप खूप धन्यवाद…
हॅपी टीचर्स डे..!
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल
माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
अशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे देखील वाचा: ‘या’ गावात शेणाने केली जाते मारामारी; हजारो वर्षे जुनी परंपरा नक्की काय?
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!