फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कु्र्नुल: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या प्रत्येक भागांत वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक राहतात. प्रत्येकांचे सणसमारंभ वेगळेवेगळे असतात. अनेक प्रकारचे सण त्या सणांची परंपरा वेगळ्या असतात. असे काही सण आहेत जे काही राज्यांमध्येच साजरे केले जातात. काही सणांच्या चालिरीती तर इतक्या विचित्र असतात की त्यांच्याबद्दल ऐकल्यावर आश्चर्य वाटते. अशीच परंपरा आंध्र प्रदेशातील एका गावात प्रचलित आहे, जिथे उगादी सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांवर शेणाने हल्ला करतात. ऐकून विचित्र वाटले ना?
पण मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुर्नूल राज्यात कैरुप्पला नावाचे एक गाव आहे. जिथे हिंदू नववर्षानिमित्त उगाडी नावाचा सण साजरा केला जातो. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक त्यांची घरे स्वच्छ करतात. घराबाहेर रांगोळी काढली जाते. नवीन कपडे घालतले जातात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने ठेवतात. तेलाने मालिश करून घरातील सदस्य आंघोळ करतात. यानंतर लोक मंदिरात जातात आणि मित्रांना भेटतात.
पहिला दिवस उपासनेत जातो, पण दुसरा दिवस आणखी विचित्र होतो. या दिवशी गावकरी दोन गट तयार करतात. आणि मग एकमेकांवर शेण फेकतात. या गावात शेणाणे मारामारी केली जाते. लोक एकमेकांवर असे शेण फेकतात जणून ते तलवारीने वार करत आहेत त्यांच्यात युद्ध सुरू असल्यासारखे वाटते. असे म्हणतात की त्या गावातील जुनी परंपरा आहे. या परंपरेला येथील लोक पिडाकला समरम किंवा पिडाकला युद्ध म्हणतात.
कशी सुरू झाली ही परंपरा?
ही शेकडो वर्ष जुनी परंपरा असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. असे मानले जाते की देवी भद्रकाली आणि देव वीरभद्र यांचा विवाह होणार होता. वीरभद्र देवीला लग्नासाठी विचारत होता. त्यावेळी भद्रकालीने त्याला नकार दिला आणि सांगितले की, जर तो लग्नासाठी आला तर ती त्याच्यावर शेण टाकेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा वीरभद्र लग्नासाठी आला तेव्हा भद्रकालीने गावकऱ्यांना शेणाने त्याच्यावर हल्ला करण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही देवी-देवतांचे अनुयायी एकमेकांवर शेणाने हल्ला करू लागले. या घटनेनंतर देऴी भद्रकाली आणि वीर भद्र दोघांनी लग्न केले. तेव्हापासून आंध्र प्रदेशातील कैरुप्पला गावांत ही प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की शेण खाल्ल्याने लोकांचे आरोग्य सुधारते आणि त्या वर्षी गावात चांगला पाऊस होतो.