Weight Loss Special Calcium Rich Makhana Tikki Recipe In Marathi
वजन कमी करायचंय पण टेस्टी खाण्याची इच्छा होतेय? मग घरी बनवा कॅल्शियमने भरपूर असलेली ‘मखाना टिक्की’
Makhana Tikki Recipe : मखाना एक पौष्टिक सुपरफूड असून यात कमी कॅलरी, हाय फायबर आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आढळून येतो. वजन कमी करायचे असल्यास याचे सेवन फार फायद्याचे ठरते, कारण ते पोट अधिक काळ भरलेले ठेवते.
मखाना एक हेल्दी स्नॅक्सचा प्रकार आहे. यामुळे पोट अधिक काळ भरून राहते.
याला अनेकदा तुपात हलके भाजून खाल्ले जाते पण तुम्हाला माहिती आहे का? यापासून तुम्ही चवदार टिक्की देखील बनवू शकता.
ही मखाना टिक्की वेट लॉसमध्ये तुमची मदत करेल.
मखाना आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. कमी कॅलरी असलेला मखाना कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. मखाना खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि बराच वेळ भूक लागत नाही. त्यामध्ये साखर आणि फॅट जवळजवळ नसल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरतो. नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी मखाना टिक्की हा एक उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे. यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालता येतात आणि मूग डाळ आणि बेसनामुळे टिक्कीला चांगली बाइंडिंग आणि अप्रतिम चव मिळते. चला तर मग जाणून घेऊया मखाना टिक्कीची सोपी रेसिपी.