Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या

बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसलेली भव्य हवेली म्हणजे जयपूरजवळील चोमू पॅलेस, जो आज हेरिटेज हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या ऐतिहासिक सौंदर्यामुळे आणि चित्रपटांतील उपस्थितीमुळे पर्यटकांमध्ये त्याचे विशेष आकर्षण आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 08:55 AM
17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या

17 व्या शतकातील ते महल जिथे झाली होती भूल भुलैयाची शूटिंग, जाण्यासाठी किती पैसे लागतात? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • चोमू पॅलेस हा ३५० वर्षांहून जुना ऐतिहासिक राजवाडा असून आता लक्झरी हेरिटेज हॉटेल आहे.
  • ‘भूल भुलैया’, ‘क्वीन’, ‘बोल बच्चन’सारख्या अनेक बाॅलिवूड चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे.
  • मुंबईहून विमान, रेल्वे किंवा बसने जयपूरपर्यंत जाऊन पुढे टॅक्सीने पॅलेसला पोहोचता येते.
बाॅलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आपल्या दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. नुकताच अक्षय कुमारचा “भूत बंगला” हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एक सुंदर आणि आलिशान हवेली दाखवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये या हवेलीला दाखवण्यात आले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण ही हवेली सुमारे ३५० वर्षे जुनी असून १७ व्या शतकातील आहे. तिची भव्यता आणि शाही थाट पाहण्यासारखा ठरतो आणि म्हणूनच दरवर्षी अनेक पर्यटक या हवेलीला भेट द्यायला जातात. चला इथे कसं जायचं आणि जाण्यासाठी नेमका किती खर्च येईल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव

कुठे आहे ही हवेली?

या हवेलीचे नाव आहे चोमू पॅलेस जे जयपूरपासून एनएच-११ वर सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर वसले आहे. हे महल आता एका हाॅटेलच्या स्वरुपात ओळखले जाते. याच्या इतिहासाविषयी बोलणं केलं तर, हा पॅलेस सुमारे ३५० वर्षांहून अधिक जुना आहे. जयपूरपासून राजघराण्याचे वंशज असलेल्या राव गोपालजींनी १५५० च्या दशकात या राजवाड्याची बांधणीला सुरुवात केली होती. मूळतः उमराव आणि सेनापतींसाठी एक तटबंदीयुक्त निवासस्थान म्हणून बांधलेल्या या भव्य राजवाड्याचे, कालांतराने एका आलिशान हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर झाले.

कोणकोणत्या चित्रपटांची शूटिंग पार पडली आहे?

बाॅलिवू़च्या अनेक चित्रपटांची शूटिंग या हवेलीमध्ये करण्यात आली आहे. सर्वप्रथम, १९९६ मध्ये ‘लोफर’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी चोमू पॅलेसचा वापर करण्यात आला होता. नंतर २००७ साली अक्षय कुमारचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट इथे शूट करण्यात आला. यानंतर २००९ साली ‘गुलाल’ या चित्रपटाचे शूटिंग देखील याच महलात पार पडले. त्यानंतर २०११ साली ‘क्वीन’ या चित्रपटात चौमुन पॅलेस दिसला आणि अजय देवगणच्या ‘बोल बच्चन’ या चित्रपटाचे चित्रीकरणही चौमुन पॅलेसमध्ये झाले होते. आता ‘भूत बंगला’मध्ये हा राजवाडा भुताचा वाडा बनवण्यात आला आहे.

भारताची जादुई ट्रेन… 88 स्टॉपेज आणि 9 राज्यांमधून करते प्रवास, या सर्वात मोठ्या रूटने बनवलाय रेकॉर्ड

मुंबईहून चोमू पॅलेसला कसे जायचे?

विमान : मुंबईहून विमानाने पॅलेसला जाण्याचा पर्याय सर्वात जलद पर्याय ठरेल. जयपूर विमानतळावरून, चोमू पॅलेसपर्यंतच्या शेवटच्या ३०-४० किमी (अंदाजे १ तास) प्रवासासाठी टॅक्सी भाड्याने घ्या किंवा खाजगी कार बुक करा.

रेल्वेने: बजेट कमी असेल तर रेल्वेचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे. यासाठी मुंबई सेंट्रल (MMCT) किंवा बांद्रा टर्मिनस (BDTS) येथून जयपूर जंक्शन (JP) पर्यंत ट्रेन करा. जयपूरहून चोमू पॅलेसपर्यंत जाण्यासाठी स्थानिक टॅक्सी किंवा कॅब करावी लागेल.

बसने: मुंबईहून जयपूरला जाण्यासाठी पेटीएम किंवा खाजगी ट्रॅव्हल्ससारख्या सेवांद्वारे थेट बस सेवा उपलब्ध आहेत (अंदाजे २७-२८ तास), त्यानंतर स्थानिक टॅक्सीचा पर्याय आहे.

 

Web Title: The 17th century palace where bhool bhulaiyaa was shoot know how to go there travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Jaipur
  • travel news
  • Video Palace

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या
1

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या
2

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या
3

Travel : दोन भावांनी नोकरी सोडून बनवला मातीचा आलिशान विला, हजारो पैसे घालवून लोक येतात राहायला; कुठे आहे ते जाणून घ्या

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…
4

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.