(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel Tips : 30 ओलांडायच्या आत फिरून या ही सुंदर ठिकाणे, लाईफटाइम लक्षात राहील अनुभव
या कालावधीत ती ३१०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापते आणि संपूर्ण मार्गावर ८८ स्थानकांवर थांबते. यामुळेच ती इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरते. हा लांबचा प्रवास इतका विस्तृत आहे की ट्रेनला तिच्या अंतिम स्थळी पोहचण्यासाठी किमान चार दिवस लागतात. परिणामी या ट्रेनच्या मॅनेजमेंटसाठी एकूण सात ट्रेन सेट तैनात केले जातात. प्रत्येक दिशेने तीन गाड्या अविरतपणे धावतात आणि अखंड सेवा सुनिश्चित करण्यासाठी एक अतिरिक्त सेट देखील ठेवला जातो.
या ट्रेनची आणखी एक खासियत म्हणजे तिचा मार्ग… अवध एक्सप्रेस आसाम, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान या नऊ राज्यांमधून जाते. एवढ्या विशाल प्रदेशाला जोडणारी ही ट्रेन देशाच्या विविध संस्कृती आणि प्रदेशांना एकत्र गुंफते. आणखी एक खासियत म्हणजे, या ट्रेनला ८८ थांबे आहेत. ट्रेन साधारणपणे प्रत्येक स्टेशनवर २ ते ५ मिनिटे थांबते. एकूण प्रवासाचा वेळ अंदाजे साडेचार तास आहे जो केवळ स्टेशनवरील थांब्यावरच खर्च होऊन जातो. ट्रेनच्या याच वैशिष्ट्यांमुळे या ट्रेनला ‘जादुई ट्रेन’ म्हटले जाते. कारण तिचा प्रवास केवळ अंतर कापण्यापुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण भारताला जोडणारा आहे.
काश्मीर फिरण्याचा प्लॅन करा Cancel, एप्रिलमध्ये या तारखेपर्यंत जारी केलाय अलर्ट…
आसाम एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी AC (1st, 2nd, 3rd), स्लीपर क्लास आणि जनरल असे विविध कोच उपलब्ध असतात. लांब प्रवास असल्यामुळे यात झोपण्याची सुविधा, चार्जिंग पॉइंट्स, तसेच केटरिंग सेवा देखील दिली जाते. काही प्रमुख स्थानकांवर अन्न व पाण्याची सोय सहज उपलब्ध असते. ही ट्रेन दररोज धावते आणि मोठ्या संख्येने प्रवासी यात प्रवास करतात.






