Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य स्किन केअर करून त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 10:01 AM
वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांसह पुरुषांना आपली त्वचा कायमच मुलायम, चमकदार,डाग विरहित, टवटवीत आणि फ्रेश हवी असते. चेहऱ्यावर कोणतेही डाग किंवा चिकटपणा नसल्यास मेकअप केल्यानंतर तो दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहतो. पण वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेच्या समस्या वाढू लागतात. पूर्वीच्या काळी वयाच्या ४० व्या वर्षानंतर उद्भवणाऱ्या समस्या हल्ली तरुण वयातच निर्माण होऊ लागल्या आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा टॅन झाल्यासारखी वाटणे, चेहऱ्यावर मोठे पिंपल्स इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने त्वचेच्या समस्या वाढतात आणि चेहरा खूप जास्त थकल्यासारखा वाटतो. चेहऱ्यावरील तेज कमी झाल्यानंतर कितीही मेकअप केला तरीसुद्धा त्वचा सुंदर दिसत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचा टवटवीत आणि ताजीतवानी ठेवण्यासाठी या टिप्स आवर्जून फॉलो कराव्यात. यामुळे वयाच्या तिशीनंतर सुद्धा त्वचेच्या कोणत्याच समस्या उद्भवत नाही.(फोटो सौजन्य – istock)

केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस

नियमित सनस्क्रीन लावावे:

वर्षाच्या बाराही महिने चेहऱ्यावर नियमित सनस्क्रीन लावावे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावावे. घरात असताना किंवा घरातून बाहेर जाताना कायमच सनस्क्रीन लावावे. चेहऱ्यावर न लावल्यास त्वचा काळी पडण्याची जास्त शक्यता असते. त्वचेमध्ये वाढलेला ओलावा वाढवण्यासाठी आणि निर्जीव झालेली त्वचा पुन्हा एकदा फ्रेश करण्यासाठी सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे. SPF 50 आणि PA++++ असलेल्या सस्क्रीनचा वापर त्वचेसाठी करावा.

त्वचा हायड्रेट ठेवणे:

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी चेहरा हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त सुकल्यासारखी वाटते. याशिवाय पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स सुद्धा येतात. त्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. नियमित ४ ते ५ लिटर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात ओलावा टिकून राहतो. पाण्यासोबतच विटामिन सी युक्त पेयांचे सेवन करावे. याशिवाय नियमित मॉइश्चरायजरचा वापर करावा.

विटामिन सी सीरम:

बदलते हवामान, धूळ, माती आणि प्रदूषणाच्या दीर्घकाळ सानिध्यात राहिल्यामुळे त्वचा काळी होऊन जाते. चेहऱ्यावर डेड स्किन जमा झाल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि टॅन होते. त्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित रात्री झोपण्याआधी विटामिन सी सिरमचा वापर करावा. अवेळी येणारा वयस्करपणा रोखण्यासाठी विटामिन सी सिरमचा वापर करावा.

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो

जास्त स्क्रब न करणे:

त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी काही लोक नियमित स्क्रब करतात. पण नियमित स्क्रब केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊ शकते. चेहऱ्यावर लाल रॅश, डाग येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. त्यामुळे स्क्रब करण्यासाठी बाजरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही क्रीमचा वापर न करता स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम टिकून राहतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The beauty of the skin will remain even after the age of 30 follow these simple tips regularly without spending much

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
2

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
3

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
4

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.