केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती वाटते? मग मेथी दाण्यांचा 'या' पद्धतीने करा वापर, महिनाभरात होतील लांबलचक केस
सर्वच महिलांना आपले केस कायमच घनदाट आणि लांबलचक हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी हेअर ट्रीटमेंट केल्या जातात तर कधी महागडे हेअर सीरम आणि हेअर प्रॉडक्ट वापरून केसांची काळजी घेतली जातात.पण वातावरणात होणारे बदल आणि जीवनशैलीतील छोट्या मोठ्या चुका संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करतात. केस गळणे, केसांमध्ये टक्कल पडणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी असंख्य केसांच्या समस्या वाढू लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस खूप जास्त कोरडे आणि निस्तेज होतात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. बऱ्याचदा केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या हेअर मास्क आणि हेअर पॅकचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा केस चमकदार आणि सुंदर दिसत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लांबलचक केसांसाठी मेथी दाण्यांचा वापर करून हेअर पॅक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने तयार केलेला मेथी हेअर पॅक केसांच्या मुळांना भरपूर पोषण देईल आणि केस लांबलचक करण्यास मदत करेल.(फोटो सौजन्य – istock)
मेथी दाण्यांचा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मेथी दाणे घेऊन त्यात पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले मेथी दाणे घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात ३ चमचे दही घालून मिक्स करा. तयार केलेला हेअर पॅक काहीवेळ तसाच ठेवून द्या. त्यानंतर हेअर पॅक केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून काहीवेळ तसेच ठेवा. हेअर पॅक केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो.
केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत हेअर पॅक लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. हेअर पॅक लावून झाल्यानंतर ३० मिनिट केसांमध्ये तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. केमिकल युक्त हेअर पॅकचा वापर केसांसाठी करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. यामुळे केसांवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहण्यास मदत होईल आणि केस घनदाट होतील.
मेथी दाण्यांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. केस घनदाट आणि सुंदर होण्यास मदत करतात. तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये मेथी दाण्यांच्या फेस पॅकचा समावेश करावा. यामुळे केस सुंदर होण्यास मदत होते. आठवड्यातून एकदा मेथी दाण्यांचा हेअर पॅक केसांवर लावल्यास केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते आणि केस स्वच्छ होतात. टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी मेथी दाण्यांपासून बनवलेला हेअर पॅक लावावा.






