मांजर जर रस्ता ओलांडताना दिसली तर ते अशुभ असते.आपण ज्या कामाला चालललो आहे ते काम बिघडते, पण ज्योतिषशास्त्रात माता लक्ष्मीला संपत्तीची देवी आणि कुबेराला संपत्तीची देवता म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक संकटे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात मांजरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते,दिपावलीला लक्ष्मीची पूजा करताना घरातील ज्येष्ठांना मांजर दिसली तर ते शुभ मानले जाते. मांजरीचे दर्शन होणे, मांजरीचे आगमन शुभ असते. त्याचबरोबर काही लोक याला अशुभही मानतात.






