फोटो सौजन्य - Social Media
बाबा वेंगाची भविष्यवाणी कधी कधी धोक्याचे संकेत देतात तर कधी कधी हृदयाला दिलासा देतात. दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातीला बाबा वेंगा हे नाव प्रचलित असतं. बाबा वेंगा हे नाव इतके प्रसिद्ध झाले आहे कि लोकं वर्षाच्या सुरुवातीला दिग्दर्शिका बघण्यापेक्षा बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांची पाने पाहण्यास सुरुवात करतात. कारण, बाबा वेगाच्या मुखातून निघालेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बाबा वेंगाने केलेले दावे सत्यात उतरले आहेत. त्यामुळे बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनी लोकांमध्ये आस तर जागी केलीच आहे तशी भीतीही निर्माण केली आहे. बाबा वेंगाने त्यांच्या भविष्यवाणीत चांगल्या तसेच वाईट गोष्टीही नमूद केल्या आहेत.
२०२४ वर्ष आता उत्तरार्धात आहेत. अगदी काहीच दिवसांनी हे वर्ष समाप्तीस येणार आहे. या भविष्यवाण्यांमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तर काही वाईट गोष्टी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे येते वर्ष वैद्यकीय क्षेत्रासाठी फार महत्वाचे ठरणार आहे. कर्करोगासारख्या भयंकर आजारावर मात करणाऱ्या वॅक्सीनसाठी संशोधन सुरु आहेत. २०२५ मध्ये हे संशोधन पूर्णत्वास येणार आहेत. कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर या वर्षी वॅक्सीन मिळणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंग यांनी केली आहे.
महत्वाची गोष्ट अशी आहे कि स्वतः वैद्यनिकांनी या गोष्टीला संमती दिली आहे कि ते कॅन्सरसाठी औषध शोधण्यास प्रयत्नशील आहेत. कॅन्सरच्या औषधांवर रिसर्च सुरु आहे. लवकरच, कर्करोगाने त्रासलेल्या रुग्णांना दिलासादायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बाबा वेंगाच्या २०२५ साठीच्या भविष्यवाण्यांमध्ये पूर्व आणि पश्चिम यांच्यातील विनाशकारी युद्धाचा उल्लेख आहे, ज्यामुळे युरोपवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यांनी २०२५ मध्ये परग्रहवासीयांशी संपर्क साधला जाईल, असेही भाकीत केले आहे, ज्यामुळे मानवजातीच्या भविष्यात मोठे बदल होऊ शकतात.
बाबा वेंगाच्या काही भविष्यवाण्या सत्यात उतरल्या आहेत, जसे की ९/११ हल्ले आणि २००४ चा हिंद महासागरातील त्सुनामी. तथापि, त्यांच्या अनेक भविष्यवाण्यांची सत्यता आणि स्रोतांबद्दल शंका उपस्थित केली जाते. त्यांच्या काही भविष्यवाण्या अप्रमाणित किंवा अलीकडील काळात तयार केल्या गेल्या असल्याचे दिसते. त्यामुळे, बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांना पूर्णपणे सत्य मानण्यापूर्वी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या काही भाकितांमध्ये सत्यता असू शकते, परंतु त्यांची सर्व भविष्यवाण्या अचूक आहेत, असे मानणे योग्य नाही.