फोटो सौजन्य: Freepik
आजकाल हार्टच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातही हार्टमध्ये ब्लॉकेज असणाऱ्या रुग्णात सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या बदलत्या राहणीमान तसेच खानपानामुळे ही समस्या वाढत चालली आहे. हार्ट ब्लॉकेजमुळे हृदयाचे ठोकेअनियमित होतात. तसेच काही वेळानंतर हे ठोके मंद होतात.
हे देखील वाचा: अचानक एखाद्या व्यक्तीस Heart Attack आल्यास काय करावे? ‘हा’ उपाय वाचवेल प्राण
30 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांमध्ये हार्ट ब्लॉकेज दिसून येतो. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये काही विशेष सवयी समाविष्ट केल्या तर तुम्ही हार्ट ब्लॉकेज टाळू शकता. तुमच्या हार्टला ब्लॉकेजपासून वाचवण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयींचा अवलंब करू शकता ते आज आपण समजून घेऊया.
हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच पालक, ब्रोकोली, मेथी यासारख्या हिरव्या भाज्या रोज खाव्यात. जेणेकरून तुमचे कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि हृदय मजबूत राहील.
फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात जे हृदयरोगांपासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात. सफरचंद, संत्रा, बेरी यासारखी फळे रोज खाल्याने तुमच्या हृदयाच्या धमन्या स्वच्छ राहतात आणि ब्लॉकेज टाळतात.
प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यात चालणे, धावणे, सायकल चालवणे, योगासने करणे इत्यादींचा समावेश करता येईल. हे व्यायाम हृदयासाठी चांगले तर आहेच पण यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय मजबूत होते.
बदाम, अक्रोड आणि यांसारखे ड्राय फ्रुटस तसेच आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये चांगले फॅट्स असतात जे हृदय निरोगी ठेवतात. दररोज मूठभर काजू खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
पाणी पिणे ही फक्त एक क्रिया नसून हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि रक्त पातळ ठेवते. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या ज्यामुळे तुमच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेजचा धोका कमी होईल.
तणाव कोणाला नसतो पण जात तणावात राहणे महागात पडू शकते. तणाव हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. ध्यान, योग आणि चांगली झोप घेऊन तुम्ही तणाव कमी करू शकता. तसेच दररोज एकाग्र चित्ताने ध्यान करा. यामुळे मन शांत राहील आणि हृदयाचे आरोग्य सुधरेल.