(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ॲक्शन चित्रपटांची क्रेझ साऊथ आणि बॉलिवूडमध्ये नेहमीच पाहायला मिळते. आता हीच ॲक्शनची झलक मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळणार आहे. रविकांता फिल्म्स निर्मित आणि अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या ॲक्शनपटाचा पोस्टर अनावरण सोहळा मुंबईतील वांद्रे येथे थाटामाटात पार पडला.
या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार तसेच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. मुंबईत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांवर तसेच शहरात आणण्यात आलेल्या आरडीएक्सच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे.
“मिशन मुंबई” या चित्रपटात अनेक दमदार ॲक्शन दृश्ये पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आनंद जोग, विजय पाटकर आणि अजॉय शर्मा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत विसपुते आणि कैलास पवार यांनी केले असून कथा चंद्रकांत विसपुते यांची आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर “मिशन मुंबई” चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत असून चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.
या पोस्टर अनावरण सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेता अजॉय शर्मा, ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे, किरण चव्हाण, फाईट मास्टर फय्याज सय्यद यांच्यासह दिग्दर्शक कैलाश पवार, चंद्रकांत विसपुते आणि दिग्दर्शक शिरीष राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या या चित्रपटाच्या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांवर तसेच शहरात आणण्यात आलेल्या आरडीएक्सच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चित्रपटात थरारक आणि दमदार ॲक्शन दृश्ये पाहायला मिळणार आहेत.
“मिशन मुंबई” चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता अजय शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार असून विजय पाटकर, आनंद जोग, सुरेखा कुडची हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत असतील. तसेच ओम राणे, संकेत मोरे, प्रशांत कराड, सिद्धेश आचरेकर, शांती बावकर, अश्विनी तेंडुलकर, विपुल भोईर, राहुल कानाडोल, लक्ष्मी निवृत्ती पंधे आणि किरण चव्हाण हे कलाकार देखील चित्रपटात झळकणार आहेत.
रविकांता फिल्म्स निर्मित आणि अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” या चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार आणि चंद्रकांत विसपुते यांनी केले आहे. चित्रपटाची कथा चंद्रकांत विसपुते यांची असून पटकथा व संवाद मच्छिंद्र कदम यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण नंदलाल चौधरी यांचे आहे, तर मेकअप किशोरजी पिंगळे करत आहेत. संगीताची धुरा समीर खोले यांनी सांभाळली असून फाइट मास्टर फय्याज सय्यद यांनी चित्रपटातील ॲक्शन दृश्ये साकारली आहेत.
दरम्यान, “मिशन मुंबई” या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






