मंत्री शंभुराज देसाई (फोटो- सोशल मीडिया)
अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करत असल्याचे आले निदर्शनास
मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिले उत्तर
उमा खापरे यांनी उपस्थित केला होता प्रश्न
मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, ओव्हरलोड वाहने आणि रस्त्यांची दुरवस्था या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लवकरच संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर पर्यावरण विभाग, परिवहन विभाग आणि गृह विभाग या विभागासमवेत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, अभिजीत वंजारी, कृपाल तुमाने, डॉ परिणय फुके यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोळसा वाहतुकीदरम्यान काही अवजड वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखा आणि परिवहन विभाग यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर योग्य दर्जाचे आच्छादन अनिवार्य करण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून त्यासाठी पर्यावरण विभागाकडून आवश्यक स्पेसिफिकेशन घेण्यात येणार आहे. तसेच ओव्हरलोड वाहतूक रोखण्यासाठी पोलिस आणि आरटीओ विभागाच्या फ्लाईंग स्क्वॉडची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Pune News: ‘परवाना नसलेल्या फेरीवाल्यांवर…’; मंत्री शंभूराज देसाई देणार लवकरच आदेश
जिल्हा खनिज निधीतून चंद्रपूरमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या कडेला धूळ उडू नये यासाठी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावरचा ताण कमी करण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्सकडून सुमारे ४८० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत असून त्याद्वारे जवळपास १० मिलियन टन कोळसा रस्त्याऐवजी रेल्वे मार्गाने वाहतूक करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून संबंधित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा रुग्णालयांमध्ये विशेष आरोग्य युनिट सुरू करण्याबाबतही सूचना दिल्या जाणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
मंत्री शंभूराज देसाई देणार लवकरच आदेश
पुण्यातील रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी ज्या फेरीवाल्यांकडे परवाना नाही अशांबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना तातडीने देण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. पुण्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे होणारी वाहूतक कोंडी याबाबत सदस्य बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य राहूल कुल, प्रशांत बंब, भीमराव तपकीर यांनी सहभाग घेतला.






