मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होण्यास कारणीभूत ठरतात 'या' सवयी, वेळीच बदल न केल्यास होईल आयुष्यभराचे नुकसान
महिलांचे आरोग्य कशामुळे बिघडते?
मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होण्याची कारणे?
मासिक पाळी अनियमित का होते?
जीवनशैलीत सातत्याने होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे महिलांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून गेले आहे. महिला शरीरसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होणे. मासिक पाळीच्या चक्रात झालेला बिघाड संपूर्ण शरीराचे गंभीर नुकसान करतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. मासिक पाळी वेळेवर न येणे, PCOD, PCOS इत्यादी समस्या उद्भवल्यानंतर गर्भधारणेत अडथळे निर्माण होतात. बऱ्याचदा शरीरात वाढलेला मानसिक आणि शारीरिक तणाव गंभीर आजारांचे कारण ठरतो. मासिक पाळीच्या समस्यांकडे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दुर्लक्ष केले जाते. गंभीर आजार स्वतः महिलाच ओढवून घेतात. जीवनशैलीत केलेल्या सामान्य चुकांचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रात लगेच दिसून येतो. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो कच्चा कांदा! जाणून घ्या कांदा कोणी खावा आणि खाऊ नये
सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न कार्याच्या वेळी अनेकांना पाळी पुढे किंवा मागे येण्याच्या गोळ्या खाण्याची सवय असते. या गोळ्या खाणे अनेकांना अगदी सामान्य वाटते. पण डॉक्टरांच्या मते, पाळी पुढे जाण्याच्या गोळ्यांचे सेवन करणे म्हणजे मासिक पाळीच्या चक्रात स्वतःहून छेडछाड करणे. या सवयी शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे ठरलेल्या वेळी येणे हे गरजेचे आहे. मासिक पाळी पुढे मागे जाण्यासाठी कोणत्याही गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.
ओबेसिटीच्या नावाखाली अनेक लोक वजन झपाट्याने कमी करतात. पण असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरावर अनावश्यक चरबीचा थर वाढल्यानंतर तो योग्य पद्धतीने कमी करावा. कोणत्याही गोळ्या आणि सप्लिमेंट्सचे अजिबात सेवन करू नये. स्थुलता आणि पाळी यांचा थेट सबंध आहे. वजन वाढल्यानंतर पाळीच्या चक्रात बदल होतो. शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी पुढे जाऊन गर्भधारणेत अडथळे निर्माण करते.
पुरूषांसोबतच महिलासुद्धा मोठ्या प्रमाणावर धूम्रपान, मद्यपान आणि इतर काही व्यसने करतात.या व्यसनांचा परिणाम केवळ पचनसंस्था आणि फुफुसांवरच नाहीतर संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. अतिप्रमाणात व्यसन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. वाढत्या उष्णतेचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर लगेच दिसून येतो. त्यामुळे व्यसनाच्या आहारी न जाता योग्य जीवनशैली जगणे फार आवश्यक आहे.याशिवाय काहींना सतत कोणत्याही बारीक बारीक गोष्टींचा वापर करण्याची खूप जास्त सवय असते. पण यामुळे मानसिक संतुलन होते आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.
Ans: तणाव, हार्मोनल बदल, अयोग्य आहार, पीसीओएस (PCOS), किंवा वजन कमी/जास्त होणे यामुळे पाळी अनियमित होऊ शकते.
Ans: पाळी ३-४ दिवस उशिरा येणे सामान्य मानले जाते, परंतु ५-६ दिवसांपेक्षा जास्त उशीर झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: दर ४-६ तासांनी सॅनिटरी पॅड बदलावे. सुती अंतर्वस्त्र वापरावे आणि गुप्तांग स्वच्छ व कोरडे ठेवावे.






