या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो कच्चा कांदा! जाणून घ्या कांदा कोणी खावा आणि खाऊ नये
कच्चा कांदा खाण्याचे फायदे?
कच्च्या कांद्याचे सेवन कोणी करू नये?
कांद्यामध्ये कोणते घटक असतात?
जेवणातील विविध पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. कांद्याच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते आणि जेवणाला छान सुगंध सुद्धा येतो. काहींना जेवणात कच्चा कांदा खाण्याची सवय असते. जेवणाच्या ताटात जर कांदा नसेल तर ताट अपूर्णच वाटते. भाजी, पोळी किंवा डाळ-भातासोबत कच्च्या कांद्याची कोशिंबीर किंवा सॅलड म्हणून सुद्धा कांदा खाल्ला जातो. कच्चा कांदा खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी आणि पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. पण दैनंदिन जेवणासोबत कांदा खाणे योग्य असेलच असे नाही. कांदा खाल्ल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात तितकेच तोटे सुद्धा होतात. अतिप्रमाणात कांद्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात कांद्याचे सेवन करावे आणि करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
कच्चा कांदा प्रत्येक व्यक्तीसाठी फायदेशीर ठरत नाही. यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. एक वाटी कापून घेतलेल्या कांद्यामध्ये सुमारे ६४ कॅलरीज आणि ३ ग्रॅम फायबर आढळून येते. याशिवाय कांद्यात विटामिन सी, विटामिन बी६, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांचा उत्तम स्रोत असतो. हे सर्व गुणधर्म शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. कांद्यामध्ये ‘क्वेर्सेटिन’ आणि सल्फर संयुगे आढळून येतात. ज्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे गुणकारी घटक रक्तात जमा झालेला वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी मदत करतात. रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि हृदयाच्या दीर्घकालीन आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी कांद्याच्या सेवन केले जाते.
कांद्यामध्ये प्री-बायोटिक फायबरसारखे घटक आढळून येतात. पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देण्यासाठी कांद्याचे सेवन करावे. कांद्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. कांदा आणि लसूण यांसारख्या ‘एलियम’ वर्गातील भाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल आणि कर्करोगासंबंधित आजारांचा धोका टाळता येईल. यामध्ये असलेले घटक हानिकारक पेशी नष्ट करण्यास मदत करतात.
डॉक्टरांच्या मते, पोटाचे आजार आणि दीर्घकालीन आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात कच्च्या कांद्याचे अजिबात सेवन करू नये. ज्यांना ‘IBS’ किंवा पचनसंस्थेचा त्रास असेल अशांनी कच्च्या कांद्याचे सेवन अजिबात करू नये. कच्च्या कांद्यातील ‘फ्रुक्टन’ मुळे पोटात गॅस होणे, पोट फुगणे, पोटात पेटके, जुलाब होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कच्च्या कांद्याचे सेवन करू नये. कच्च्या कांद्यात असलेल्या ॲसिड इरिटेशनमुळे छातीत जळजळ वाढणे, आंबट ढेकर येणे यांसारख्या गंभीर तक्रारी वाढू शकतात. मायग्रेन असलेल्या व्यक्तींनी कच्च्या कांद्याचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय काहींना कच्चा कांदा खाल्ल्यानंतर खाज सुटणे, रॅशेस येणे, ओठ किंवा जिभेला सूज येणे, डोळ्यातून पाणी येणे, नाकात अडथळा जाणवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता असते.
Ans: कांदा चिरताना त्यातील एन्झाईम्स आणि सल्फ्यूरिक संयुगे हवेत मिसळतात, ज्यामुळे डोळ्यात जळजळ होऊन पाणी येते.
Ans: कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी ६ आणि पोटॅशियम असते, जे हृदयाचे आरोग्य, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि पचनासाठी चांगले असते.
Ans: होय, उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.






