हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जगभरात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर काहींनाच अचानक मृत्यू देखील होतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा. हार्ट अटॅक येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलची चिकट थर वाढू लागल्यानंतर रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो.(फोटो सौजन्य – istock)
वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
शरीरामध्ये दोन प्रकरचे कोलेस्ट्रॉल. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल., चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात हेल्दी फॅट्स निर्माण करतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल हृद्यासह संपूर्ण शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतात. त्यामुळे हार्ट ब्लॉकेज होण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला श्रीराम नेने यांनी हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? जीव वाचवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर माहिती.
हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजची समस्या निर्माण होते. डाव्या रक्तवाहिनीमधील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. अशावेळी हृदयाचे कार्य बंद होते. हार्ट अटॅक आल्यानंतर छातीमध्ये वाढलेल्या तीव्र वेदना हळूहळू खांद्यांपर्यंत पसरतात. ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, थंड घाम इत्यादी अनेक दिसू लागतात. तसेच २० टक्के रुग्णांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. शरीरात कोणतीही लक्षणे न दिसून येतात काही लोक अचानक बेशुद्ध पडतात. याला कार्डियाक अरेस्ट असे म्हणतात. हार्ट अटॅक आल्यानंतर काही लोक बेशुद्ध होतात, ज्यांच्या मेंदूमधील ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही. याशिवाय हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाचे पंपिंग व्यवस्थित होत नाही.
हार्ट अटॅक आल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय घराच्या आजूबाजूला असलेल्या रुग्णालयात लगेच उपचारासाठी दाखल करावे. रुग्णांवर एक तासाच्या आतमध्ये उपचार सुरु करावे. हार्ट अटॅकपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कायमच शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे.
हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय करावे?
फळे, भाज्या, कमी चरबीयुक्त पदार्थ आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम करा. ध्यान, योग किंवा इतर विश्रांतीच्या तंत्रांचा अवलंब करा.
हार्ट अटॅक म्हणजे काय?
हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) म्हणजे हृदय स्नायूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे किंवा थांबल्यामुळे होणारी एक गंभीर वैद्यकीय स्थिती. जेव्हा हृदय स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा ते खराब होऊ लागतात आणि काहीवेळा पूर्णपणे निकामी होऊ शकतात.