उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे
वर्षाच्या बाराही महिने बाजारात लिंबू उपलब्ध असतात. लिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि सायट्रिक ऍसिड त्वचा सुधारण्यासाठी मदत करते. नियमित एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायले जाते. पण आरोग्यासाठी कोमट किंवा गरम पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला हानी पोहचत नाही. यामध्ये असलेले विटामिन सी, अँण्टीऑक्सिडंट्स आणि खनिजे इत्यादी आवश्यक घटक शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लिंबू पाण्याचे नियमित सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
सकाळी उठल्यानंतर लिंबू पाण्याचे सेवन केल्यास मेटाबॉलिझम चांगले राहते. कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास शरीराची पचनक्रिया सुधरण्यास मदत होईल. याशिवाय पोटात वाढलेला जडपणा, गॅस, अपचन आणि ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळेल. गरम पाण्याच्या सेवनामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढते. शरीराच्या रक्तवाहिन्या खुल्या होऊन रक्तप्रवाहात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत. घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावा . लिंबातील गुणधर्म आणि गरम पाण्यातील उष्णता घसा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन करतात. मात्राव कोणत्याही चुकीच्या सप्लिमेंटचे सेवन करण्याऐवजी लिंबू पाण्याचे उपाशी पोटी सेवन करावे. कोमट पाण्यात लिंबाचा रस, काळे मीठ आणि जिऱ्याची पावडर मिक्स करून नियमित महिनाभर प्यायल्यास झपाट्याने पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी होईल. वेटलॉस ड्रिंक म्हणून तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी कारण्यासाठी लिंबू पाणी प्यावे.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले अँण्टी ऑक्सिडंट्स त्वचेतील विषारी पदार्थ कमी करतात. सकाळी उठून उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीर नैसर्गिक रित्या डिटॉक्स होईल. दिवसाची सुरुवात करताना शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे.
कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी होते का?
होय, कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, कारण लिंबूमध्ये असलेले घटक चयापचय क्रिया सुधारतात आणि भूक कमी करतात.
कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीराला काय फायदे होतात?
कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचन सुधारणे, त्वचेसाठी चांगले असणे, निर्जलीकरण टाळणे आणि शरीराला डिटॉक्सिफाईड करणे यांचा समावेश आहे.
कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत का?
जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्यास ऍसिडिटी किंवा दातांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे.