आतड्यांमध्ये सडलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर!
निरोगी आरोग्य जगताना शरीराची पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. नेहमीच मन फ्रेश राहण्यासाठी आणि कायम आनंदी राहण्यासाठी सर्वच सतत काहींना काही प्रयत्न करत असतात. निरोगी आरोग्याचे रहस्य शरीराच्या पचनसंस्थेवर अवलंबून असते. मात्र बऱ्याचदा जीवन जगताना केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुका आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. सतत आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेले तणाव, जंक फूडचे अतिसेवन, तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात फायबरची कमतरता निर्माण झाल्यानंतर पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी प्रमाणात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
स्वयंपाक घरातील ‘हा’ पदार्थ खोकला अपचनावर आहे प्रभावी, पावसाळ्यातील सर्व आजारांपासून राहाल लांब
शरीराची पचनक्रिया बिघडण्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवणे, मळमळ, जेवणाची इच्छा न होणे, सतत मूड बदलत राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होईल.
कायम निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी आहारात सफरचंद खाणे आवश्यक आहे. बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये असलेले सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. सफरचंदामध्ये असलेले नैसर्गिक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सफरचंदमध्ये असलेले पेक्तिन फायबर आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देण्यास मदत करतात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात नेहमीच पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये आढळून येणारे फायबर आणि पपेन घटक पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक ठरतात. याशिवाय पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून ३ ते ४ वेळा पपईचे सेवन करावे.
अळशीच्या बिया आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अळशीच्या बियांमधील फायबर, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आतड्या स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच अळशीच्या बियामधील लिग्नॅन्स नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. अळशीच्या बिया भाजून त्यांची पावडर गरम पाण्यासोबत तुम्ही खाऊ शकता.