Iran Mosque Dispute: 'धर्माविरुद्ध सरकार…' इराणमध्ये ८०,००० मशिदी आहेत निशाण्यावर; पेझेश्कियानांचा स्फोटक आरोप ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पेझेश्कियान म्हणाले की, सरकार संकटात सापडलं असताना, सामाजिक आर्थिक आव्हानं वाढली असताना आणि सामान्य नागरिक संघर्ष करत असताना, धर्मगुरू आणि मशिदींची भूमिका अधिक सक्रिय असायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात लोकांना मदत करण्याऐवजी मशिदी फक्त प्रशासनिक बोलणी आणि आदेशांचे केंद्र बनल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
त्यांनी पुढे सुचवलं की, जर देशातील प्रत्येक मशिदीने किमान एक कुटुंब दत्तक घेतलं, तर इराणच्या सामाजिक संरचनेत मोठा आणि परिणामकारक बदल घडू शकतो. त्यांच्या मते, मशिदींचं नेटवर्क इतकं व्यापक आणि लोकांपर्यंत पोहोचणारं आहे की, योग्य सहभाग आणि उपक्रम राबवले तर ते सरकारी यंत्रणेइतकंच प्रभावी ठरू शकतं.
या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर देशाची राजकीय परिस्थिती आधीच तणावपूर्ण आहे. इस्रायल-हमास संघर्षात हमासचे कमांडर याह्या सिनवार यांच्या मृत्यूनंतर इराण-इस्रायल तणाव वाढला आहे. पेझेश्कियान यांनी सांगितले की, त्यांच्या शपथविधीनंतरच्या काही आठवड्यांतच परिस्थिती गुंतागुंतीची झाली असून आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. त्यामुळे काही तातडीचे निर्णय घेणे कठीण झाले आहे.
इराणच्या अंतर्गत राजकारणाचा मोठा भाग कट्टरपंथी आणि सुधारणावादी गटांमध्ये विभागला गेला आहे. पेझेश्कियान हे सुधारणावादी भूमिकेचे प्रमुख चेहरे मानले जातात. त्यांच्या विरोधात कट्टरपंथी गटांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु या वेळी त्यांनी थेट मशिदी आणि धार्मिक नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्याने परिस्थिती अधिक नाजूक बनली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
धार्मिक मठ, मौलवी आणि इस्लामिक प्रभावशाली गटांचे बहुसंख्य सदस्य कट्टरपंथी गटाशी जोडलेले आहेत, असे मानले जाते. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी केलेले विधान हे धर्मप्रस्थ सत्ता आणि कट्टरपंथी विचारसरणीला मोठं आव्हान म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या विरोधकांनी आता खुलेपणाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली असून सोशल मीडियावरही या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे, सुधारणावादी गट आणि जनसामान्यांचा मोठा वर्ग पेझेश्कियान यांच्या विचाराला समर्थन देत आहे. त्यांचा दावा आहे की, धर्म फक्त विधींसाठी नसून मानवसेवेसाठी असतो आणि जर मशिदी लोकांच्या दैनंदिन जीवनात आणि संकटात साथ देऊ शकत नसतील, तर त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. इराणमध्ये सत्तासंघर्ष, धार्मिक सत्ता, सुधारणावाद आणि सामाजिक वास्तव यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला असून या वादाचे पुढील परिणाम प्रदेशातील राजकारणाला नव्या वळणावर नेण्याची चिन्हे दिसत आहेत.
Ans: त्यांनी मशिदी आणि धर्मगुरू समाजसेवेत अपयशी असल्याचे म्हटले.
Ans: सुमारे ८०,०००.
Ans: कट्टरपंथी गटांनी विरोध सुरू केला आणि मोठा वाद निर्माण झाला.






