भारतीय पोरींचा गाजावाजा! कबड्डी विश्वचषक जिंकून रचला इतिहास (Photo Credit - X)
संपूर्ण स्पर्धेत भारताचा दबदबा
भारतीय महिला संघाने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ग्रुप स्टेजपासून ते फायनलपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने आपले सर्व ग्रुप सामने मोठ्या फरकाने जिंकले. उपांत्य फेरीत भारतीय संघाने बलाढ्य इराणला ३३-२१ अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात चीन तैपेईला मात देऊन भारताने दिमाखात विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, चीन तैपेईनेही आपले सर्व लीग सामने जिंकले होते आणि उपांत्य फेरीत यजमान बांग्लादेशला २५-१८ ने हरवून ते अंतिम फेरीत पोहोचले होते.
🚨 THIS IS PRETTY HUGE NEWS FOLKS 💥 WORLD CUP WINNING MOMENTS FOR INDIA 🏆 Indian Women’s Team defeated Chinese Taipei 35-28 in the Finals of Kabaddi World Cup 2025! Our Girls successfully defends the Trophy 🇮🇳💙 pic.twitter.com/rEp45Qu6aW — The Khel India (@TheKhelIndia) November 24, 2025
दिग्गजांकडून भारतीय संघाचे कौतुक
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कबड्डी क्षेत्रातील दिग्गजांनी संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे:
मनप्रीत सिंग (हेड कोच, हरियाणा स्टीलर्स): “महिला टीमने असा प्रदर्शन केला आहे, ज्यावर संपूर्ण देशाला अभिमान वाटू शकतो. त्यांचा आत्मविश्वास आणि सांघिक कार्य (Teamwork) शानदार राहिले. एक माजी भारतीय खेळाडू म्हणून मला माहीत आहे की या स्तरावर पोहोचणे किती कठीण आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला खूप खूप शुभेच्छा!”
अजय ठाकूर (हेड कोच, पुनेरी पल्टन): “ढाकामध्ये महिला टीमने सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकणे, ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. फायनलपर्यंत त्यांचे वर्चस्व हे दाखवते की गेल्या काही वर्षांत महिला कबड्डीने किती प्रगती केली आहे. बांग्लादेशमध्ये वर्ल्ड कप झाल्यामुळे या खेळाची जागतिक लोकप्रियताही स्पष्टपणे दिसून येते. पुढील वर्षांमध्ये ही गती कायम राहील अशी आशा आहे.”
या महिला कबड्डी वर्ल्ड कप २०२५ मध्ये एकूण ११ देशांनी भाग घेतला होता, हे दर्शवते की महिला कबड्डी जागतिक स्तरावर किती वेगाने पुढे सरकत आहे.
भारताच्या मुलींनी ३० दिवसांत ३ विश्वचषक जिंकले
भारताच्या मुली सध्या संपूर्ण देशाचे नाव उंचावत आहेत. गेल्या ३० दिवसांत भारताने ३ विश्वचषक जिंकले आहेत. प्रथम, भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने अंध महिला टी२० विश्वचषकात असाधारण कामगिरी केली. त्यांनी अंतिम सामन्यात नेपाळला ७ विकेट्सने हरवून कोलंबोमध्ये अंध महिला टी२० विश्वचषक जिंकला. हा पहिलाच अंध महिला टी२० विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर, भारतीय महिला कबड्डी संघानेही विश्वचषक जिंकला.






