फोटो सौजन्य: iStock
आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की भारत ही एक सोनेकी चिडिया आहे. आणि ते खरे देखील आहे. आज आपल्या देशात असे कित्येक गुप्त जागा आहेत ज्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने देशाला फायदा होऊ शकतो. आज आपण अशाच एक ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे देशातील पहिला सूर्योदय होतो. ही जागा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ काढू शकता.
अरुणाचल प्रदेशमधील एका खेड्यात देशातील पहिला सूर्योदय होतो. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य असण्याव्यतिरिक्त, अरुणाचल प्रदेश देखील मेरिडियन रेषेच्या अगदी जवळ आहे. यामुळेच भारताच्या इतर भागात अंधार असताना येथील डोंग गावात सूर्योदय होतो.
अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात असलेले डोंग हे गाव भारतातील अशा काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे देशात सर्वप्रथम सूर्योदय होतो. या सुंदर गावाला “भारताचे पहिले सूर्योदय ठिकाण” असे म्हटले जाते. निसर्गाचा हा विलक्षण नजारा स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावा म्हणून सूर्योदय प्रेमी येथे लांबून येतात व आपले काही दिवस आनंदाने इथे घालवतात.
हे देखील वाचा: पांढरे तीळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या
डोंग गावात सूर्योदय झाला की इथले संपूर्ण वातावरण बदलून जाते. आकाश हळूहळू लाल होते आणि नंतर सूर्याची पहिली किरणे दिसू लागतात. हे दृश्य इतके मनमोहक असते की इथे येणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध होणार म्हणजे होणारच.
अरुणाचल प्रदेशच्या कुशीत वसलेली डोंग व्हॅली भारताची ‘उगवत्या सूर्याची भूमी’ म्हणून ओळखली जाते. देशाच्या पूर्वेकडील टोकाच्या अगदी जवळ असल्यामुळे, ही दरी भारतात प्रथमच सूर्याची किरणे पाहण्याची संधी देते. 1240 मीटर उंचीवर वसलेले, या खोऱ्यातील सूर्योदय पाहण्यासाठी उत्सुक असलेले पर्यटक रात्री 2 किंवा 3 वाजता सर्वोच्च शिखरावर पोहोचतात व कधी नव्हे तो मनमोहक सूर्योदय अनुभवतात.
डोंग गावात आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक आदिवासी जमाती राहतात, त्यामुळे हे क्षेत्र मर्यादित आहेत. भारतातील इतर राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्यासाठी इनर लाइन परमिट (ILP) घेणे अनिवार्य आहे. ही परवानगी अरुणाचल प्रदेश सरकारद्वारे जारी केली जाते ज्यात काही विशेष अटी असतात.






