(फोटो सौजन्य: istock)
वृद्धत्व ही अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. जसजसे वय वाढते, तसतसे त्वचा सैल होणे, सुरकुत्या, फाईन लाईन्स अशा अनेक चिन्हे दिसू लागतात. हे बदल वयानुसार दिसले, तर त्याबद्दल फारशी चिंता वाटत नाही. पण आजकाल ताणतणाव, चुकीचे आहार–विहार आणि बाह्य प्रदूषणामुळे ३० वर्षांच्या वयातच व्यक्ती ५० वर्षांची वाटू लागते. अशा वेळी ही समस्या त्रासदायक ठरते. जर तुम्हालाही अकाली वृद्धत्व जाणवत असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
सुरकुत्या लपवण्यासाठी अनेकजण महागडे क्रीम्स व ट्रीटमेंट्स वापरतात. मात्र यामध्ये रसायने असतात. त्यामुळे आपणास नैसर्गिक आणि सुरक्षित असा उपाय सांगत आहोत. हा उपाय सौंदर्यतज्ज्ञ व कंटेंट क्रिएटर मनप्रीत कौर यांच्या व्हिडिओवर आधारित आहे. त्यांच्या मते या उपायामुळे चेहऱ्यावर दिसणारे वृद्धत्वाचे चिन्ह कमी होऊ शकतात.
साहित्य
मेथी दाणे
धने (बिया)
दालचिनी
अॅलोवेरा जेल
कॅस्टर ऑईल
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
कृती
१. अर्धा पॅन पाणी उकळण्यासाठी ठेवा.
२. त्यात मेथी दाणे, धने आणि दालचिनी टाका.
३. पाणी अर्ध्याहून कमी होईपर्यंत उकळा.
४. उकळताना मिळणाऱ्या वाफेने चेहऱ्याला स्टीम घ्या – यामुळे पोर्स साफ होतात.
५. तयार झालेले पाणी गाळून घ्या.
६. त्यात अॅलोवेरा जेल, कॅस्टर ऑईल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा.
७. हा मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा.
मेथी दाण्याचे फायदे
मेथी दाण्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी व अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे त्वचेवरील डाग, पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतात. त्याशिवाय त्वचेला पोषण मिळते आणि ती मऊ व टवटवीत दिसते.
अतिरिक्त टिप्स
त्वचा घट्ट करण्यासाठी जीवनशैलतील कोणते बदल करावे?
निरोगी वजन राखा, हायड्रेटेड राहा, संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, सूर्यप्रकाशापासून तुमच्या त्वचेचे रक्षण करा, धूम्रपान टाळा, चेहऱ्यावर मालिश करा.
त्वचा घट्ट करण्यासाठी कोणती ट्रेंटमेन्ट कायमस्वरूपी राहते?
जर तुम्ही कायमस्वरूपी आणि लगेच लक्षात येण्याजोगे परिणाम शोधत असाल, तर सर्जिकल ट्रीटमेंट तुमच्या अपेक्षांनुसार असू शकतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.