जाणून घ्या उन्हाळ्यात ओठ फाटण्याची कारणे आणि घरगुती उपाय
शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम त्वचा आणि आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहीवेळा त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये ओठांचे आरोग्य बिघडून जाते. ओठ फाटणे, ओठांच्या साली निघणे, याशिवाय काहीवेळा ओठांमधून रक्त येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेसोबत ओठांच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. ओठांच्या आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र ओठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता ओठांची योग्य ती काळजी घ्यावी. ओठांना पडलेल्या भेगांमुळे काहीवेळा ओठांमधून रक्त येऊ लागत.(फोटो सौजन्य – iStock)
उष्णतेमुळे फाटलेले किंवा खराब झालेले ओठ सुधारण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र हे प्रॉडक्ट काहीवेळा ओठांसाठी गुणकारी ठरत नाही. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम ओठ आणि त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ओठ कशामुळे फाटतात? ओठांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास ओठांचे आरोग्य सुधारेल.
आपल्यातील अनेकांना नेमके ओठ कशामुळे फाटतात याचे कारणंच माहित नाही. ओठांचे आरोग्य बिघडल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता ओठांचे आरोग्य सुधारण्यासाठी घरगुती उपाय केल्यास ओठांना अनेक फायदे होतात. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ फाटणे किंवा ओठ कोरडे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ओठांना पडलेल्या भेगांमुळे काहीवेळा ओठांच्या आतील स्किन निघण्यास सुरुवात होते. अशावेळी ओठांना तूप किंवा नारळाचे तेल लावावे.
शरीरात ओमेगॉ ३ फॅटी ऍसिडची पातळी कमी झाल्यानंतर नियमित अक्रोडचे सेवन करावे. विटामिन बी च्या कमतरतेमुळे ओठांमधून रक्त येऊ लागते. ओठांमधून रक्त आल्यानंतर अनेक लोक घाबरून जातात. पण घाबरण्याऐवजी आहारात पालक खावे. पालक शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी नियमित आवळा खावा. यामुळे तुमचे ओठ काळे पडणार नाहीत.