मेष (Aries) :
आज मेहनतीचे फळ चांगले असेल, विचार केलेली कामे लवकर पूर्ण होतील. येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी बेत आखू शकाल. खास व्यक्तीसह मनातल्या गोष्टी शेअर कराल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. सामाजिक समतोल आणि प्रतिष्ठा उत्तम राहिल.
वृषभ (Taurus) :
आज तुमचं व्यक्तीमत्व आकर्षक राहील. घर, जमीनीबद्दल काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. दिवसभर पैशांविषयी विचार कराल. नवीन कामं हाती घेण्यासाठी इच्छूक असाल तर अणखी नवीन कामे हाती लागतील. चांगली बातमी कानी लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन (Gemini) :
नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काहीजणांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. काही बाबतीत अचानक फायदा मिळेल. आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.
कर्क (Cancer) :
नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्यांना इतरांची मदत मिळेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल.
सिंह (Leo) :
वरिष्ठांचं सहकार्य तसं कमीच मिळेल. व्यवसायात सावध राहा. एकटेपणापासून दूर राहा. साथीदारासोबत एखादा प्रवास घडू शकतो. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामं वाढू शकतात. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. नव्या संधी मिळतील. येणाऱ्या दिवसांत आधी केलेल्या कामांमधून प्रगती, फायदा होण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo) :
गोंधळात अडकलेल्या परिस्थितीतून चांगला मार्ग निघण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळेल. संबंधांमध्ये सुधार होऊ शकतात. सर्वांचा आदर ठेवा. तुमच्या निर्णयात स्पष्टपणा असेल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील.
तूळ (Libra) :
मनात चांगले विचार येतील. विश्वासातील लोकांकडून सल्ला घ्या. त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रतिभा सिद्ध करण्यात यशस्वी रहाल. सामाजिक कामामुळे सन्मान मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुपित पणे तुमची मदत करेल. साथीदाराकडून आर्थिक सहकार्य मिळेल.
वृश्चिक (Scorpio) :
अविवाहीत लोकांसाठी दिवस चांगला आहे. विवाहीत लोकांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. सामाजिक कामे करण्यासाठी हदिवस चांगला आहे. महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील.
धनु (Sagittarius) :
जुन्या अडचणी दूर होतील. परिस्थिती अनुकूल असेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वडिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस सामान्य असेल. पती-पत्नी मधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn) :
अडचणींमधून मुक्त व्हाल. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमचे काम सुखकर हेईल. नवीन वस्तू विक्री करण्याचे योग आहेत. व्यवसायात कुटुंबाकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. नवीन भेटी होतील. विद्यार्थीवर्गाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल. काहीही बोलण्याआधी विचार करा. तुमच्या बोलण्याने वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius) :
आर्थिक व्यवहारात समजदारीने काम करा. जीवनसाथी कडून घेतलेला सल्ला लाभदायक ठरू शकतो. पैसे कमावण्याचे नवे बेत आखाल. कौटुंबिक मुद्द्यांचे समाधान मिळेल. जर आपली इच्छा असेल तर दिवसा पाहिलेली आपली स्वप्ने खरी ठरू शकतात. तुम्हाला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक व्यक्तींसोबत भेटीगाठी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मीन (Pisces):
विचार केलेली पूर्ण होण्याचे योग आहेत. नोकरी नाहीतर रोजच्या कामांमध्ये बदल करावा लागेल. खरेदी फायदेशीर ठरू शकेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. संवादांची अदला-बदल आणि आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वात उत्तम आहे.