राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर
एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला
पोटात चाकू भोकसून केला हल्ला
मुंबई: राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप-शिवसेना आणि ठाकरे बंधु यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे आपल्या उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. प्रचारादरम्यान शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार करत असताना उमेदवाराच्या पोटात चाकू भोकसल्याची घटना घडली आहे.
शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रचार सुरू असताना उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकण्यात आयाला आहे. या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. या उमेदवारावर सध्या जवळच्या रूग्णालयात उपचार केले जात आहेत.
बांद्रा येथील परिसरात हाजी सालीन कुरेशी प्रचारासाठी गेले होते. त्यावेळेस प्रचार करत असताना त्यांच्या पोटात चाकू भोसकण्यात आला. त्यामुळे परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस पुढील तपास करत आहेत. हाजी सालीन कुरेशी यांच्यावर कोणी हल्ला केला याचा शोध घेतला जात आहे.
हे देखील वाचा : भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. मात्र संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर प्रचार सुरु असताना हा हल्ला झाला आहे.
विशेष बाब म्हणजे एआयएमआयएम पक्षाचाच नाराज नेत्यांनी हा हल्ला केला आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. यामुळे एआयएमआयएम पक्षातील नेते नाराज होते. याच नाराज नेत्यांकडून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वर्तुळामध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. यानंतर कार्यकत्यांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.






