फोटो सौजन्य - Social Media
अथर्वने काही दिवसांपूर्वी PMPML च्या बसमध्ये एक रील शूट केली होती. ही रील फार चर्चेत आली होती. या रीलमुळेच अथर्वला PMPML च्या कारवाहीला सामोरे जावे लागले. या रीलमध्ये हेतू मनोरंजनाचाच होता. एक महिला प्रवाशी कंडक्टर (अथर्व सुदामे) कडे एक फुल आणि एक हाफ तिकीटची मागणी करते. पण ज्याच्यासाठी हाफ तिकीट मागवण्यात आले आहे तो तिचा पती असतो. त्यामुळे अथर्व (कंडक्टर) महिलेला सांगतो की यांची तिकीट का म्हणून हाफ काढायची? तेव्हा ती तिच्या पतीला Half Mad असल्याचे सांगून म्हणून Half तिकीट द्या असे सांगते. तेव्हा अथर्व मस्तीमध्ये त्या महिलेला मग तुमची तर Did तिकीट काढावी लागेल कारण तुम्ही तर डिड शहाणे आहात, असे म्हणतो.
अथर्वचे म्हणणे आहे की ही रील केवळ मनोरंजनासाठी काढण्यात आली होती. परंतु, त्याला PMPML च्या बशीमध्ये परवानगीशिवाय रील काढणे चांगलेच महागात पडले असल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये त्याचे काही चाहतेमंडळी पेटून उठले आहेत. त्यांनी सरळ PMPML कडेच प्रश्न केला आहे की “जेव्हा तुमचा स्टाफ किंवा इतर कुणी बसीत परवानगी नसूनही Reel बनवतं तेव्हा त्यांच्यावर का नाही Action घेतली जात. फक्त अथर्व सुदामेच का?”
चाहत्यांनी असे अनेक प्रश्न उपस्थित केले असून या सगळ्या प्रकरणी अथर्वला मात्र ५० हजारांचा दंड भरावा लागणार आहे, अन्यथा माहिती तंत्रज्ञानांतर्गत त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असे PMPML कडून सांगण्यात आले आहे.






