दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
सर्वच महिलांसह पुरुषांना सुद्धा आपले दात पांढरे शुभ्र आणि चमकदार हवे असतात. दातांच्या स्वच्छतेसाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. मात्र तरीसुद्धा दातांवरील पिवळेपणा कमी होत नाही.दातांवर वाढलेला पिवळा आणि चिकट थर दातांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकतो. त्यामुळे दातांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. चुकीचा आहार, सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन, चिकट कडक पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडून जाते. दातांमध्ये अन्नाचे बारीक बारीक कण तसेच राहिल्यामुळे दात खराब होऊन कीड लागण्याची शक्यता असते. दातांवर लागलेली कीड इतरही दात खराब करून टाकते. यामुळे दातांवर पिवळा थर साचून राहतो.(फोटो सौजन्य – iStock)
दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्याऐवजी घरगुती उपाय करून दातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्यानंतर दात स्वच्छ ब्रश करून घ्यावे. यामुळे दातांमधील अन्नाचे बारीक कण निघून जातील. आज आम्ही तुम्हाला दातांवर साचून राहिलेला पिवळा आणि चिकट थर काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मोत्यासारखे सुंदर दात सगळ्यांचं हवे असतात. यासाठी तुम्ही टूथपेस्टमध्ये चिमूटभर हळद आणि मीठ टाकून ब्रशने दात स्वच्छ करून घ्या. हा उपाय नियमित केल्यास दात स्वच्छ दिसतील. दातांवरील पिवळेपणा किंवा तंबाखू खाऊन लाल झालेले दात स्वच्छ होतील. यामुळे दातांवरील कीड किंवा दातांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळेल. हळद आणि मिठाचा वापर केल्यामुळे दातांच्या सर्व समस्या दूर होतील.
दात स्वच्छ ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे दात स्वच्छ होतील. त्यामुळे दैनंदिन आहारात स्ट्रॉबेरी, कच्चे गाजर, काकडी, सफरचंद इत्यादी फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे दातांवरील पिवळेपणा, पांढरा थर आणि प्लेक निघून जाईल. याशिवाय दात सुद्धा स्वच्छ होतील.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात जांभळं उपलब्ध असतात. जांभळाचे सेवन केल्यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जाईल. जांभळाच्या सालीची पावडर तयार करून त्यात सैंधव मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून दातांवर हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे तुमचे दात मजबूत होतील. जांभळ्याच्या सालींपासून बनवलेली पावडर तुम्ही डब्यात बनवून तुम्ही स्टोर करू शकता.