फोटो सौजन्य: iStock
भारतीयांसाठी चहा हे फक्त पेय नसून खूप काही. म्हणूनच तर आजही कित्येकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. ग्रीन टी, ब्लॅक किंवा दुधाचा चहा असो, तो अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. यातही अनेकांना ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिण्याची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी योग्य आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय दातांसाठी हानिकारक ठरू शकते. तसेच हळूहळू ही सवय दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. या गोष्टीची कदाचित आपल्याला जाणीवही होणार नाही! आता प्रश्न पडतो की चहा तर सकाळी आपल्याला ताजेतवाने करतो, मग त्याचा तोटा कसा आणि का? खरंतर चहाचे स्वतःचे फायदे आहेत, पण जर आपण ब्रश केल्यानंतर लगेच चहा पित असाल, तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो.
रोज धुवाल तर केस स्वच्छ नाही, पूर्णपणे सफाचट होतील! मग काय करावे? जाणून घ्या
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या मते, दातांवर वारंवार ॲसिडचा परिणाम झाल्यास इनॅमल कमकुवत होऊ शकतो. ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिण्याने ही प्रक्रिया अधिक वेगाने होऊ शकते.
NIH च्या संशोधनानुसार, ब्रश केल्यानंतर दात काहीसे संवेदनशील होतात. अशावेळी चहामधील टॅनिन्स दातांच्या पृष्ठभागावर चिकटतात आणि दात पिवळसर होण्याची शक्यता वाढते. दुसरीकडे, टूथपेस्टमध्ये असलेले फ्लोराइड दातांना बळकट करण्याचे काम करते. मात्र, जर ब्रश केल्यानंतर लगेच चहा घेतला, तर फ्लोराइडची संरक्षक थर लवकर निघून जाण्याचा धोका असतो.
चहा (विशेषतः लिंबासह किंवा दूधाशिवाय) किंचित एसिडिक असतो. ब्रश केल्यावर टूथपेस्ट किंवा ब्रशच्या हालचालींमुळे दातांची पृष्ठभाग किंचित मऊ होते. जर लगेच ब्रश केल्यानंतर चहा किंवा असे कोणतेही पेय घेतले गेले, तर त्यातील एसिड दातांच्या इनॅमलला आणखी मऊ करतो. यामुळे दातांवर डाग पडण्याची शक्यता वाढते आणि इनॅमल इरोजन म्हणजे दातांच्या चमकदार थराचा गळती होण्याचा धोका वाढतो.
कोणी पुचका म्हणतं तर कोणी गोलगप्पा? पाणीपुरीला इतक्या नावांनी का ओळखले जाते? जाणून घ्या
संशोधनानुसार, ब्रश केल्यानंतर किमान 30 ते 60 मिनिटे थांबणे योग्य ठरते. या काळात काही हलक्या गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो. उदा. पाणी पिणे, तोंड धुणे किंवा शक्य असल्यास कॅल्शियमयुक्त पदार्थ (दूध, दही इत्यादी) घेणे.
महत्वाची सूचना: आरोग्यासंबंधित कुठलीही समस्या असल्यास सर्वात पहिले डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे.