सणासुदीच्या काळात 'या' ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट
आपली स्वतःची कार असावी हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. यातही कार बजेट ठरल्यानंतर खरेदीदार उत्तम ऑफरच्या शोधात असतात. खासकरून सणासुदीच्या काळात तर हमखास कार्सवर आकर्षक डिस्काउंट ऑफर दिल्या जातात.
दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. याच सणासुदीच्या काळात अनेक जण नवीन गोष्टी खरेदी करत असतात. यात मग नवीन कपडे आले, नवीन घर आले आणि नवीन कार सुद्धा आली. या सणासुदीत अनेक ऑटो कंपन्या सुद्धा त्याच्या कारवर दमदार डिस्काउंट ऑफर करत असतात. नुकतेच Volkswagen ने देखील त्यांच्या कारवर दमदार डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे.
2 लाखाचं डाउन पेमेंट आणि Toyota Taisor ची चावी हातात मिळाल्याशिवाय राहणार नाही, किती असेल EMI?
फेस्टिव्ह सिझन सुरू झाला आहे. यासोबतच, फोक्सवॅगन इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी दमदार डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत, कंपनी त्यांच्या वाहनांवर 3 लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. या डिस्काउंटच्या ऑफरमध्ये फ्लॅट कॅश डिस्काउंट, एक्सचेंज, स्क्रॅपेज बोनस आणि लॉयल्टी बोनस समाविष्ट आहे. ही सवलत Volkswagen च्या Tiguan, Taigun आणि Virtus वर उपलब्ध आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये फोक्सवॅगन Tiguan के R Line व्हेरिएंटवर 3 लाखांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. Tiguan ला अलीकडेच 3.27 लाखांची GST सूट मिळाली आहे, ज्यामुळे ती आणखी स्वस्त झाली आहे.
मिडसाईज SUV Volkswagen Taigun वर October 2025 मध्ये 2 लाख रुपये पर्यंतची सूट दिली जात आहे. याच्या Comfortline 1.0-लीटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट ची किंमत 10.58 लाख रुपये पासून सुरू होते. याशिवाय, Taigun 1.5 TSI GT Plus व्हेरिएंट वर 1.95 लाख रुपये पर्यंतची सूट मिळत आहे.
स्टायलिश आणि प्रीमियम सेडान Volkswagen Virtus वर October 2025 मध्ये 1.56 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर मिळत आहे. याच्या Highline 1.0 TSI व्हेरिएंट वर सर्वाधिक सूट दिली जात आहे. त्याचबरोबर Virtus GT Plus व्हेरिएंट वरही आकर्षक ऑफर दिला जात आहे.