दात घासल्या घासल्या चहा पिणे योग्य असते का? (फोटो- istockphoto)
Lifestyle News: आपले रोजचे जीवन हे अत्यंत धावपळीचे असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाची धावपळ सुरू असते. तसेच आपल्यातील बहुतांश लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असते. काही जण बेड टी घेतात तर काही जण दात घासल्या घासल्या चहाचे सेवन करतात. बरेच दात घासल्या घासल्या चहा पितात हे किती योग्य आहे? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.
सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा पिण्याची सवय असते. त्यात दुधाचा चहा असेल किंवा ग्रीन, ब्लॅक टी असे कोणत्याही प्रकारचा चहा अनेक जण पितात. दात घासल्या-घासल्या चहा पिणे चांगले असते का? ते जाणून घेऊयात. दातांवर याचा काही परिणाम होतो का? हे पाहुयात.
अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्यानुसार, दातांवर जेव्हा सारखा सारखा अॅसिडचा मारा होतो. त्यामुळे दातांचे इनेमलवर परिणाम होतो. ब्रश केल्यावर लगेचच चहा प्यायलयास इनेमल परिणाम होण्याची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, ब्रश केल्यावर दात जास्त सेंसेटीव्ह होतात. अशा वेळेस चहा प्यायलयास त्यातील टॅन्सिस दातावर चिकटून राहतात. तर दुसरीकडे टुथपेस्टमध्ये फ्लोराईड असते, जे दाताला मजबूत करते.