आपली स्किन ग्लोईंग आणि हेल्दी (Glowing and Healthy Skin) असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी ते बरेच प्रयत्न करत असतात. काही वेळा कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा (cosmetic products) वापर केला जातो. पण कधी कधी त्याचा काहीच फायद होत नाही. अनेक जण घरगुती उपाय देखील करत असतात. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला असाच काही सोपा घरगुती उपाय (Home remedies) सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही ग्लोईंग स्किन मिळवू शकता.
फेस्टिवल सीझनला (festival season) सुरुवात झाली आहे. रक्षाबंधननंतर आता गणेशोत्सव सण (Ganesh Festival 2022) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव सणासाठी अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी पार्लरला जातात. ग्लोईंग स्किनसाठी ते अनेक प्रकारचे फेशियल, क्लिन अप, स्क्रब (Facials, clean ups, scrubs) करतात. जर तुम्हाला पार्लरला (Parlor) जायचे नसेल आणि कमी खर्चात तुम्ही घरगुती उपाय (Home remedies) करुन ग्लोईंग स्किन मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला हिरव्या वाटाण्यांचा वापर करुन ग्लोईंग स्किन कशी मिळवायची हे सांगणार आहोत…
असा तयार करा हिरव्या वाटण्यांचा फेस स्क्रब (Green Pea Face Scrub) –
यासाठी सर्वात आधी हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून घ्या आणि ते शिजवून घ्या. वाटाणे थंड करुन घ्या. हे वाटाणे मॅश करा. त्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने त्वचेवर स्क्रब करा. 15 मिनिटे चेहरा असाच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.