वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे
वारंवार लघवीला का होते?
मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
युटीआय झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
संपूर्ण दिवसभरात ६ ते ७ वेळा लघवीला होणे हे अतिशय सामान्य आहे. लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि किडनी स्वच्छ होण्यास मदत होते. निरोगी व्यक्तीला दिवसभरात ७ ते ८ वेळा लघवी होते. पण शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर केवळ आरोग्याचं नाहीतर लघवीसंबंधित समस्या सुद्धा उद्भवू लागतात. मधुमेह, मूत्रमार्गातील संसर्ग किंवा ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरसारख्या लघवीच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. याशिवाय युटीआयसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर लघवीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर किडनी अनावश्यक पाणी लघवीवाटे बाहेर काढून टाकते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सतत लघवीला जावेसे वाटते. तर युटीआय संसर्ग झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे, वेदना इत्यादी लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालांतराने लक्षणे वाढतात आणि किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. बऱ्याचदा शरीरातील मूत्राशय पूर्ण भरलेले नसतानासुद्धा मेंदूला लघवीला जाण्याचे संकेत मिळतात, त्या स्थितीला ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर असे सुद्धा म्हंटले जाते. मूत्रमार्गात वाढलेल्या संसर्गाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी, अन्यथा किडनीपर्यंत इन्फेक्शन पोहचू शकते. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
वारंवार लघवीला होत असेल तर टाईप-१ आणि टाईप-२ मधुमेहाची चाचणी करून घेणे फार आवश्यक आहे. कारण मधुमेह झाल्यानंतर पाणी न पिता सुद्धा वारंवार लघवीला जावे लागते. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यानंतर किडनीला ते गाळण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. रक्तात जमा झालेले ग्लुकोज शरीरातील पाणी खेचून काढते, ज्यामुळे सतत लघवीला जावे लागते. लघवीला होण्यासोबतच अचानक तहान वाढणे किंवा झपाट्याने वजन कमी होऊन जाते.
महिलांमध्ये युटीआय इन्फेक्शनचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. युटीआयची लागण झाल्यानंतर लघवीसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मूत्रमार्गातून जिवाणू आतमध्ये आल्यामुळे मुत्राशयाला सूज येते. मूत्राशय थोडेही भरले तरी लघवीला जाण्याची तीव्र इच्छा होते. लघवी करताना जळजळ, वेदना किंवा रक्त पडल्यास क्षणाचीही विलंब न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. युटीआय झाल्यानंतर पोटाच्या खालच्या भागात खूप जास्त वेदना होतात.
प्रोस्टेट ग्रंथी लघवीच्या नलिकेवर जास्तीचा दबाव निर्माण करते. यामुळे काहीवेळा मूत्राशय पूर्णपणे निकामी होऊन जाते आणि शरीरसंबंधित गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. यामुळे सतत लघवीला जावे लागते. लघवीची धार कमकुवत, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होत असल्यास तर ही सामान्य समस्या नसून शरीरसंबंधित गंभीर आजाराचे लक्षण आहे.
Ans: वारंवार लघवीला होणे हे मधुमेह, युरिन इन्फेक्शन, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा किडनीशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते.
Ans: अशा वेळी दुर्लक्ष करू नये. शरीरातील इतर लक्षणे तपासून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
Ans: पुरेसे पाणी पिणे, कॅफिनयुक्त पेये कमी घेणे, स्वच्छता राखणे आणि संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरू शकते.






