
केसांसाठी 'या' पद्धतीने तयार करा चहा पावडरचे पाणी?
सर्वच महिलांना सुंदर आणि लांबलचक केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा केसांची वाढ होत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये केसांसंबधित समस्या मोठ्या प्रमणावर उद्भवू लागतात. केस गळणे, केस कोरडे होणे. कोंडा होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागल्यानंतर केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा केसांसंबधित समस्या वाढू लागल्या आहेत. शरीरात पोषक तत्वांचा अभाव निर्माण झाल्यानंतर केस गळणे, केस पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांच्या वाढीसाठी महागड्या केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. याशिवाय केस चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे केसांना अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी चहा पावडरचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चहा पावडरचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, 3 चमचे चहा पावडर पाण्यात टाकून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून चहा पावडरचे पाणी गाळून घ्या. पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात विटामिन ई कॅप्सूल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर केस व्यवस्थित विंचरून केसांवर तयार केलेले पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून 30 मिनिटं ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. याशिवाय तुम्ही या पाण्यात चहा पावडरसुद्धा मिक्स करू शकता.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केसांसंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केस नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार दिसतील. चहा पावडरचे पाणी केसांमधील कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे केस काळे होतात. चहा पावडरच्या पाण्याने केस मसाज केल्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारून केसांना अनेक फायदे होतात. चमकदार आणि निरोगी केसांसाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. चहा पावडरमध्ये 4 % नायट्रोजन, 0.24 % फॉस्फरस, 0.25 % पोटॅशिम इत्यादी केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक आढळून येतात. त्यामुळे केस गळणे, केस तुटणे इत्यादी सर्वच समस्यांपासून सुटका मिळते.