केस स्वच्छ करण्यासाठी महागडा शॅम्पू वापरण्याऐवजी 'या' पद्धतीने करा तांदळाच्या क्लिंझरचा वापर
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी महिला सतत काहींना काही प्रयत्न करत असतात. मात्र वातावरणात होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे केसांच्या सुंदर वाढीसाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये महिला सुंदर आणि चमकदार केसांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र त्याचा फारसा फरक केसांवर दिसून येत नाही. केसांच्या निरोगी आणि चमकदार वाढीसाठी केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरले जातात. हे प्रॉडक्ट केसांसह आरोग्यासाठी सुद्धा घातक आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
केस स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शॅम्पूचा वापर केला जातो. पण केमिकल असलेले शॅम्पू केसांची गुणवत्ता खराब करून टाकतात. त्यामुळे केस स्वच्छ करण्यासाठी प्रामुख्याने सल्फेट फ्री शँम्पूचा वापर करावा. आज आम्ही तुमहाला तांदळाच्या पाण्याचा वापर करून क्लिंझर तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे क्लिंझर केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी आहे. तांदळाच्या पाण्यात असलेले गुणधर्ण केस आणि त्वचेसाठी उपयोगी आहेत. याशिवाय तांदळाच्या पाण्याच्या क्लिंझरचा वापर केल्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
तांदळाचा शॅम्पू तयार करण्यासाठी सर्वप्रथम, तांदळाचे पाणी घेऊन त्यात कढीपत्ता, कोरफडचा गर, जास्वंदीची पाने. एक चमचा चहा, कडुलिंबाची पाने इत्यादी पदार्थ मिक्स करून टोपात गरम करण्यासाठी ठेवा. तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. नंतर त्यात थोडासा शॅम्पू ग=घालून मिक्स करून घ्या.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तयार केलेले क्लिंझर केस धुवण्याआधी केसांवर ल;लावून काहीवेळ तसेच ठेवून द्या. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळेल. मिश्रण लावून झाल्यानंतर केसांवर हलक्या हाताने मसाज करा. केसांना मसाज केल्यामुळे केसांच्या मुळांना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो.१५ मिनिटं झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय तुम्ही १५ दिवसांआड करू शकता. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. कोरियन स्किन केअरमध्ये मोठ्या प्रमाणात तांदळाच्या पाण्यापासून बनवले जाते. तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेव केल्यामुळे त्वचा अधिक दिसेल.