मुंबई : व्हॅलेंटाइन डे (Valentine day) म्हणजे प्रेमाचा दिवस. प्रेमीजीव या दिवसाची आतूरतेने वाट पाहत असतात. काही आधीच प्रेमात असतात तर काही नव्याने कोण्याच्या प्रेमात पडत असतात, व या दिवशी आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा विचार करत असतात. त्यामुळे यासाठी काहीतरी नियोजनही करायला हवं. व्हॅलेंटाइन डेचा दिवसचं नाही तर संपूर्ण आठवडाही साजरा केला जातो. त्यानुसार तुम्ही तुमच्या जोडीदाराला खुश करू शकता पण त्याचसोबत तुम्ही स्वतःकडेही तितकच लक्ष देणं गरजेचं आहे.
या दिवशी आपल्या जोडीदाराला भेटण्यासाठी किंवा भेटवस्तू देण्यासाठी अनेकजन उत्सुक असतात. पण त्याचसोबत तुमचा लुकही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही काय परिधान करणार आहात याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर जे प्रेमी पहिल्यांदा एकमेंकाना भेटून मनातील भावना व्यक्त करणार असतील त्यांनी आपल्या आत्मविश्वासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मनातील भावना कोणताही संकोच न बाळगता व्यक्त करा.
कपडे निवडताना काही बाबी लक्षात ठेवा. अनेक जण आपल्या ठराविक ब्रँडच्या व्यतिरिक्त कपडे घालत नाही. परंतु ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त आपण ब्रँडला विसरून त्याऐवजी आपल्याला जे सोयीस्कर असेल असेच कपडे घालण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. अनेक वेळा ब्रँडचे कपडे आपल्या शरीराला सूट होतील असे नसतात. मग अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे ब्रँडला बळी न पडता आपल्याला शोभेल अशीच कपड्यांची निवड करणं चांगलं. भडक रंगांपासून लांब राहा. आपल्या रंगाला शोभतील अशाच रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य दिले पाहिजं. जेणेकरून आपण अधिक उठावदार दिसू. भडक रंगामुळे आपला लूक खराब होऊ शकतो.
यानंतर आपल्या जोडीदाराला भेटण्यासाठी योग्य ठिकाण निवडा. ठिकाण असं निवडा जिथे दोघांनाही आरामात पोहोचणं शक्य असेल. याशिवाय तुमच्या भेटवस्तू सोबतच काही फुलं न्यायला विसरू नका. कितीही महागडी भेटवस्तू असली तरीही फुलांतून आणखीन जास्त प्रेम व्यक्त होतं. त्यामुळे एक किंवा जास्त फुले जोडीदाराला देऊ शकता. तसेच चित्रपटगृहात चित्रपट पाहणे, तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी जाणे किंवा इतर कोणत्याही तुमच्या आवडीच्या ठिकाणी तुम्ही भेटू शकता.