बेडरूममध्ये वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. गोड नात्यासाठी बेडरूममधलं वातावरणही चांगलं असायला हवं. जर पती-पत्नीमध्ये भांडणाची समस्या असेल, तर बेडरूममध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया बेडरूममध्ये कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. ( फोटो सौजन्य- Freepik)
वास्तुशास्त्रामध्ये वैवाहिक जीवनात सुख-शांती मिळविण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. बेडरूममध्ये वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. गोड नात्यासाठी बेडरूममधलं वातावरणही चांगलं असायला हवं. जर पती-पत्नीमध्ये भांडणाची समस्या असेल, तर बेडरूममध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की, बेडरूममध्ये वास्तुदोष असल्यास नात्यात तणाव निर्माण होतो.
बेडरूमसाठी वास्तु टिप्स
बेडरुममध्ये पलंगाची दिशा दक्षिण- पश्चिम असावी. या दिशेला पलंग ठेवल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. पलंग लाकडाचा असायला हवा. लोखंडी किंवा स्टीलचा पलंग घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूमच्या भिंतींचा रंग गडद नसावा. भिंतींचा रंग हलका गुलाबी, हिरवा किंवा तपकिरी असावा. बेडच्या विरुद्ध भिंतीवर आरसा लावू नका. जर तुम्ही बेडरूममध्ये कमीत कमी वस्तू ठेवल्या, तर तुम्हाला शांत झोप लागेल आणि शांत वातावरण असेल.
बेडरूममध्ये मंद प्रकाश असावा. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.
बेडरुममध्ये मारामारीचे फोटो चुकूनही लावू नयेत. त्याऐवजी तुम्ही निसर्गाशी निगडित चित्र लावू शकता.
बेडरूममध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. असे मानले जाते की, अस्वच्छ बेडरूमचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बेडरूम नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.