घराच्या योग्य रचनेसाठी वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. ज्यामुळे घरावर, कुटुंबावर कोणतीही आपत्ती वास्तुदोषामुळे येऊ नये. घराचा प्रत्येक भाग वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. व्यक्ती भरपूर संपत्ती कमावते. पण घरातील वास्तूमध्ये कोणताही दोष निर्माण झाला तर श्रीमंत माणूसही कंगाल व्हायला वेळ लागत नाही. घरातील वातावरण नकारात्मक बनतं, भांडणं होऊ लागतात. घरातील लक्ष्मी रागावून निघून जाते. आज आपण अशाच काही वास्तु उपायांबद्दल जाणून घेऊया जे तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली ठेवण्यासाठी खूप उपयोगी (Vastu Tips) ठरतील.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या तिजोरीचं तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावं. ही कुबेरची दिशा आहे आणि असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या दिशेला तोंड करून ठेवलेली तिजोरी नेहमी संपत्ती आणि सोने-चांदीने भरलेली असते.
दुसरीकडे, पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवलेल्या तिजोरीमुळे धनहानी होते. माणसाने कितीही पैसा कमावला तरी त्याचा पैसा घरात राहत नाही आणि वाया जातो. माणूस कर्जात बुडू शकतो.