फिट राहण्यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळ्या पद्धतींचा आणि डाएटचा अवलंब करतात, कोणी प्रचंड व्यायाम करतात तर कोणी योगासने करतात, कोणी पिलेट्सला प्राधान्य देतं तर कोणी पोहणे किंवा काही खेळाचा आधार घेतात, कोणी डायटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात.
असाच एक नो रॉ डाएट. सध्या अभिनेत्री विद्या बालनने आपले कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन दाखवून दिले आहे. अभिनेत्री विद्या बालन कोणताही रॉ डाएट फॉलो करत नाही. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी विद्या घरचे शिजवलेले अन्न खाते, ग्लुटेन मुक्त पदार्थांना तिच्या आहाराचा भाग बनवला आहे आणि नो रॉ डाएट या तत्त्वाचे पालन करते. जाणून घ्या नो रॉ डाएट म्हणजे नेमके काय (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / iStock)
नो रॉ डाएट म्हणजे काय?
नो रॉ डाएट म्हणजे आहारात कच्च्या कोणत्याही गोष्टीचा समावेश न करणे. कच्च्या भाज्या, कच्ची फळे, कच्चे मांस किंवा कच्चे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. या सर्व पदार्थांचा आहारामध्ये समाविष्ट न करणे. आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश होतो ज्या एकतर शिजवल्या जातात किंवा त्यावर इतक्या प्रक्रिया केल्या जातात की त्या कच्च्या राहत नाहीत. विद्या तिच्या आहारातून तिला पुरेसे पोषण मिळेल आणि अन्न सहज चघळता येईल याची काळजी घेते.
नो रॉ डाएटचे फायदे
नो रॉ डाएटमध्ये कच्च्या कोणत्याही गोष्टी खाल्ल्या जात नाहीत कारण त्याचे अनेक फायदे आहेत. कच्च्या गोष्टी न खाल्ल्याने आजार होण्याची शक्यता कमी होते. कच्च्या अन्नामध्ये साल्मोनेला, लिस्टेरिया आणि ई. कोलाय सारखे हानिकारक जीवाणू असतात. यामुळे आरोग्य समस्या आणि संक्रमण होऊ शकतात. याशिवाय पदार्थ शिजवले की ते पचायला सोपे होतात. शिजवल्यावर पदार्थातील जड प्रथिने आणि तंतू तुटायला लागतात आणि लवकर पचतात.
हेदेखील वाचा – आंबट गोड लिची ठरेल त्वचेसाठी वरदान, जाणून घ्या होणारे फायदे
पचनाच्या समस्या असणाऱ्यांसाठी
हा आहार विशेषत: ज्यांना पचनाच्या समस्या आहेत आणि ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकार आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. नो रॉ डाएट केल्याने फायटेट्स आणि ऑक्सलेट्स सारख्या खनिजांचे शोषण रोखणारे अनेक विरोधी पोषक घटक निष्क्रिय होतात.
शिजवलेले अन्न खाणे फायदेशीर आहे पण असे काही पदार्थ आहेत जे कच्चे खाल्ले तर आरोग्यासाठी चांगले असतात. मात्र त्याचवेळी, अन्नपदार्थ उकळल्यावर वा शिजवल्यावर व्हिटॅमिन सी आणि बी जीवनसत्त्वे यांसारख्या पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे कमी होतात.
हेदेखील वाचा – Father’s Day 2024: बाबांचं वय झालंय 50 वर्षांपेक्षा जास्त, या 6 चाचण्या आवश्यक
कोणी करावे नो रॉ डाएट
आम्ही या लेखातून तुम्हाला नो रॉ डाएटचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगितले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या शरीरयष्टीनुसार आपल्या डाएटिशियनचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे डाएट फॉलो करावे. प्रत्येक माणसाची प्रकृती ही वेगळी असते. प्रत्येकाला एखाद्या गोष्टीचा चांगला अनुभव येईलच असं नाही. त्यामुळे आपल्या तब्बेतीनुसार काळजी घ्यावी.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.