चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला 'हा' उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक
कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःची काळजी घेणे विसरून जातात. शरीर आणि चेहऱ्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे दिवसभरात ५ मिनिटं वेळ काढून त्वचेसाठी देणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मोठे फोड, काळे डाग, सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअर त्वचेवर लावल्यामुळे वाढत्या वयात त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या आणि ऍक्ने वाढू लागतात. सुंदर दिसण्यासाठी केलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट काहीकाळाचं त्वचा चमकदार ठेवतात.(फोटो सौजन्य – pinterest)
सगळ्यांचं अभिनेत्रींनप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. दीपिका पादुकोण केवळ तिच्या अभिनयामुळेच नाहीतर तिच्या सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी सुद्धा फेमस आहे. सर्वच अभिनेत्री चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी केवळ स्किन ट्रीटमेंट नाहीतर घरगुती उपाय सुद्धा करतात. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर इंस्ट्स्ट ग्लो मिळवण्यासाठी दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला सोपा उपाय सांगणार आहोत. घरगुती उपाय केल्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा अतिशय उजळदार आणि सुंदर दिसते.
डाएटिशियन श्वेता शाह सोशल मीडियावर चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी सतत काहींना काही खास उपाय शेअर करत असतात. त्वचा आतून स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी केवळ क्रीम, फेसपॅक नाहीतर वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. फेसपॅक बनवण्यासाठी बार्लीचं पीठ, तांदळाचे पीठ, कोरफड जेल, पुदिन्याचा रस, मंजिष्ठा पावडर वाटीमध्ये घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण पुदिन्याच्या रसात व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बर्फाच्या ट्रेमध्ये फ्रिज होण्यासाठी ठेवा.
Multani Mitti: चेहऱ्यावर मुलतानी माती लावताना काय काळजी घ्यावी, चेहऱ्यावर कायम दिसेल Glow
तयार केलेले आईस क्यूब त्वचेवर नियमित लावून १० मिनिटं तसेच ठेवून द्या आणि त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय नियमित किंवा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होईल. बर्फाच्या थंडाव्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचेखालील रक्तभिसरण वाढून चेहऱ्यावर ग्लो येईल. डल, निस्तेज झालेली त्वचा फ्रेश करण्यासाठी आईस क्युबाचा वापर करावा.






